१८ वर्षीय गोलंदाजाचा कूच बिहार ट्रॉफीत अनोखा पराक्रम

अनंतपूर। कूच बिहार ट्रॉफी 2018 स्पर्धेत मणिपूरने अरूणाचल प्रदेशवर 10 विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. यामध्ये मणिपूरचा रेक्स राजकुमार सिंग हा या सामन्याचा नायक ठरला.

रेक्सने या सामन्यात अरूणाचल प्रदेशच्या दुसऱ्या डावात 9.5 षटके टाकताना 11 धावा देत 10 विकेट्स घेतल्या तर यातील 6 षटके निर्धाव गेली. यामध्ये त्याने पाच फलंदाजांना यष्टीचीत, दोन जणांना पायचीत, दोन विकेट्स यष्टीच्या मागे तर एक विकेट क्षेत्ररक्षकाने पकडली. तसेच तो तीन वेळा हॅट्ट्रीक वरही होता.

या सामन्यात पहिल्या डावात अरूणाचल प्रदेशने 138 धावा केल्या त्याबदल्यात मणिपूरने 122 धावा केल्या. तर अरूणाचल प्रदेशला दुसऱ्या डावात 36 धावा करता आल्या. मणिपूरने हे लक्ष्य 7.5 षटकात पार करत 55 धावा करून सामना 10 विकेट्सने जिंकला.

18 वर्षीय रेक्सने रणजी ट्रॉफीच्या सध्या सुरू असलेल्या मोसमात पदार्पण केले आहे. यामध्ये त्याने एका सामन्यात एकूण 15 विकेट्स घेतल्या होत्या. त्यातील पाच विकेट्स पहिल्या डावात 33 धावा देत घेतल्या होत्या.

याआधी आंध्र प्रदेशच्या महबूब बाशाने कूच बिहार ट्रॉफी 2009-10 मध्ये त्रिपूरा विरुद्ध 10 विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या:

या ५ कारणांमुळे रोहित शर्माला सलामीला संधी द्यायलाच हवी

मोठी बातमी- २०१९आयपीएल लिलावासाठी अंतिम खेळाडूंची निवड जाहीर

जेमतेम ६ कसोटी खेळलेला खेळाडू म्हणतो, धोनी देशाचा हिरो