अश्विन-रोहित तर बाहेर गेलेच, पण आता टीम इंडियासमोर नविनच संकट

पर्थ। शुक्रवारपासून(14 डिसेंबर) भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना पर्थमधील आॅप्टस स्टेडीयम या नवीन मैदानावर होणार आहे. या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे या मैदानवरील खेळपट्टीविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

या खेळपट्टीबद्दल मुख्य क्यूरेटर ब्रेट सिपथोर यांनी cricket.com.au ला माहिती दिली आहे की ‘आम्हाला सांगण्यात आले होते की खेळपट्टी उसळणारी आणि वेगवान बनवा, त्यामुळे जेवढे शक्य तेवढी आम्ही उसळणारी खेळपट्टी केली आहे.’

‘शिल्ड स्पर्धेत आम्ही जे केले होते, त्यानुसार आम्ही तयारी केली आहे. आम्हाला खेळाडूंकडून जी प्रतिक्रिया मिळाली होती ती खूप भयानक होती. मला वाटत नाही की आम्ही सामन्याच्यावेळी खेळाडूंबरोबर चर्चा केलेली नाही. पण आम्हाला खेळाडूंकडून जास्तीतजास्त प्रतिक्रिया हव्या आहेत.’

‘आम्हाला त्यांच्याकडून नकारार्थी प्रतिक्रिया मिळालेली नाही. ते सर्वच याबद्दल खूप सकारात्मक आहेत. आम्ही खेळपट्टीवर सारख्याप्रमाणात ओलावा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आम्हाला आशा आहे की या खेळपट्टी सारख्याच प्रमाणात वेगवान आणि उसळणारी असेल.’

या खेळपट्टीबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की भारताकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे त्यांना याचा चांगला फायदा होइल.

या मैदानावर याआधी शेफील्ड शिल्ड स्पर्धेतील वेस्टर्न वॉरियर्स आणि एनएसडब्ल्यू ब्लूज यांच्यात झालेल्या सामन्यात 40 पैकी 32 विकेट्स  वेगवान गोलंदाजांनी घेतल्या होत्या. तसेच कर्टिस पीटरसनने शतक केले होते. त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाज स्थिर झाल्यानंतर धावा करण्यात यशस्वी होऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या:

-हॉकी विश्वचषक २०१८: टीम इंडिया करणार का विश्वचषकातील पराभवाचा हिशोब चुकता?

पर्थ कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा आॅस्ट्रेलिया संघ जाहीर

कर्णधार कोहलीला पर्थची हिरवी खेळपट्टी पाहून टेन्शन ऐवजी झाला आनंद…

एमएस धोनीवर सुनील गावसकर पाठोपाठ या दिग्गज क्रिकेटपटूचाही हल्लाबोल