टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ

सिडनी। शनिवारी(12 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला वनडे सामना पार पडणार आहे. या सामन्यासाठी आज(11 जानेवारी) ऑस्ट्रेलियाच्या अंतिम 11 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

यामध्ये वेगवान गोलंदाज पिटर सिडललाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तो जवळ जवळ 9 वर्षांनी वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याने शेवटचा वनडे सामना 2010 मध्ये श्रीलंका विरुद्ध खेळला होता.

त्याच्याबरोबरच जेसन बेऱ्हेंनडॉर्फ आणि झे रिचर्ड्सन या वेगवान गोलंदाजांचाही समावेश करण्यात आला आहे. तर फिरकी गोलंदाजीसाठी नॅथन लायनची निवड झाली आहे. त्याला अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची साथ मिळेल.

या संघाच्या फलंदाजीची जबाबदारी ऍरॉन फिंच, ऍलेक्स कॅरे, शॉन मार्श, उस्मान ख्वाजा, पिटर हँड्सकॉम्ब सांभाळतील. तसेच या संघाचे नेतृत्व फिंच करेल. तसेच उपकर्णधारपद कॅरे सांभाळेल.

ऑस्ट्रेलियाला या सामन्यात कसोटी मालिकेतील पराभव विसरुन खेळावे लागणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत 1986 च्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.

सिडनी वनडेमध्ये असा आहे अंतिम 11 जणांचा संघ – 

ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍलेक्स कॅरे(उपकर्णधार), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नॅथन लायन, पीटर सिडल, झे रिचर्डसन, जेसन बेऱ्हेनडॉर्फ.

महत्त्वाच्या बातम्या-

आर अश्विनवर केलेल्या टिकेमुळे हरभजनवर माजी दिग्गज भडकले

आता विराट कोहलीही हार्दिक पंड्या, केएल राहुलच्या विरोधात…