विश्वचषक २०१९: खेळाडूने नाही तर चक्क फोटोग्राफरने घेतला एका हाताने अफलातून झेल, पहा व्हिडिओ

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु झालेल्या 2019 क्रिकेट विश्वचषकात आत्तापर्यंत क्षेत्ररक्षकांकडून अनेक शानदार झेल पहायला मिळाले आहे. पण रविवारी(2जून) द ओव्हल मैदानावर बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात एक अनोखे दृष्य पहायला मिळाले. या सामन्यात चक्क फोटोग्राफरने एका हाताने झेल घेतला आहे.

या सामन्यात बांगलादेशने दिलेल्या 331 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार फाफ डु प्लेसिसने 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने 25 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याचे अर्धशतक लाँग ऑफला षटकार मारुन पूर्ण केले.

याचवेळी डु प्लेसिसने मारलेल्या या षटकाराचा चेंडू लाँग ऑफच्या मागे डाव्या हातात मोठा टेलीफोटो लेन्स घेऊन उभ्या असणाऱ्या इयान किंग्टॉन या फोटोग्राफरने उजव्या हाताने सहज झेलला.

या घटनेचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘डिपमध्ये शानदार झेल घेत बेन स्टोक्सशी कोणीतरी स्पर्धा करत आहे. बहुगुणसंपन्न(मल्टीटलेंटेट) फोटोग्राफर!’

या विश्वचषकात सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेच्या अँडिल फेगलूकवायोचा डिप मिडविकेटच्या जवळ हवेत उडी मारत एका हाताने झेल घेतला होता. त्याच्या या झेलचे अनेकांनी कौतुक केले होते.

रविवारी(2 जून) बांगलादेश विरुद्ध डु प्लेसिसने अर्धशतक जरी केले असले तरी मात्र दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात 21 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 330 धावा केल्या होत्या. तर 331 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 50 षटकात 8 बाद 309 धावाच करता आल्या.

बेन स्टोक्सने 2019 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात घेतलेला झेल – 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९: टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार, जाणून घ्या कारण

विश्वचषक २०१९: भारताच्या या खेळाडूची झाली डोपिंग टेस्ट

टीम इंडियाचे २०१९-२० मधील घरच्या सामन्यांचे वेळापत्रक घोषित; पुणे-मुंबईमध्ये होणार हे सामने