पहा: विराट अनुष्काने श्रीलंकेत दिला गो ग्रीनचा संदेश

भारतीय क्रिकेट संघाचा तीनही प्रकारातील कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी श्रीलंकेत गो ग्रीनचा संदेश दिला. सध्या विराट कोहली हा भारतीय संघाबरोबर श्रीलंका दौऱ्यावर असून एका वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात ही जोडी पाहायला मिळाली.

या दोघांना येथे वृक्षारोपण करताना तसेच लंकेतील काही मित्रांबरोबर डांबूला येथे पाहण्यात आले. न्यूयॉर्कनंतर ही जोडी प्रथमच श्रीलंकेत एकत्र पाहायला मिळाली. अनुष्का विराट आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे काही भारतीय फॅन्सबरोबर फोटो काढतानाही छायाचित्र कोहलीच्या चाहत्यांनी सोशल माध्यमांवर शेअर केली आहेत.

Good morning everyone! 😇❤️ #Virushka 😍

A post shared by Virat Kohli (@viratkohli.club) on

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधाराने जबदस्त कामगिरी करत ८२ धावांची नाबाद खेळी केली आहे. पुढील सामना २४ ऑगस्ट रोजी पल्लेकेल येथे खेळवला जाणार आहे.