प्रो कबड्डी: सचिनच्या संघाचं नाव ‘तामिळ थलाइवा’

ह्या वर्षी प्रथमच प्रो कबड्डीमध्ये खेळत असलेल्या चेन्नईच्या संघाचे नाव तामिळ थलाइवा असे ठेवण्यात आले आहे. याची घोषणा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केली.

सचिन तामिळ थलाइवा संघाचा सहमालक आहे. या टीमच्या नावाची घोषणा करताना सचिनने एक ट्विट केला. यात सचिन म्हणतो, “आणखी एक संघ प्रो कबड्डीमध्ये. तामिळ थलाइवा या आमच्या नव्या टीमचा अभिमान आहे. येणारा ५वा प्रो कबड्डी मोसम आमच्यासाठी चांगला असेल अशी अपेक्षा. ”


प्रो कबड्डीचा ५वा मोसम २८ जून पासून सुरु होत असून या संघाला के भास्करन हे प्रशिक्षण देणार आहेत.

अमित हुडा, अजय ठाकूर आणि सी अरुण हे खेळाडू संघाची धुरा पाचव्या मोसमात संभाळणार आहे.या घोषणेबरोबर सचिनने संघाचे अधिकृत ट्विटर हॅण्डलसुद्धा टॅग केले आहे.