प्रो कबड्डी: गिरीष एर्नाक की सुरेंदर नाडा? आज पुणे विरुद्ध हरियाणात कबड्डीचा थरार

चेन्नई। प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमाची रविवारी (7 आॅक्टोबर) दमदार सुरुवात झाली आहे. या मोसमाची चेन्नई लेगपासून सुरुवात झाली आहे.

या लेगमध्ये आज पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स संघात पहिला आणि तमिळ थलायवाज विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात दुसरा सामना होणार आहे.

पुणेरी पलटनचा आज प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमातील हा दुसरा सामना आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांची यू मुम्बा विरुद्ध बरोबरी झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर हरियाणाचे आव्हान असणार आहे.
याबरोबरच पुण्याच्या नितीन तोमर आणि हरियाणाच्या मोनू गोयत या स्टार खेळाडूंमध्येही चूरस पहायला मिळणार आहे.

पुण्याच्या संघाकडे स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच विजयाचे दावेदार म्हणून पाहिले आहे. मात्र पहिल्याच सामन्यात त्यांना यू मुम्बाने तगडी लढत देत विजयापासून लांब ठेवले. त्यामुऴे पुण्याचा संघ पहिल्या विजयासाठी आज प्रयत्न करेल.

यू मुम्बा विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पुण्याकडून नितीन तोमर आणि कर्णधार गिरीश एर्नाककडून चांगली कामगिरी झाली. पण संदीपचे अपयश पुण्याच्या संघासाठी चिंता वाढवणारे आहे.

पण या संघाला सुरुवात चांगली मिळाल्यास प्रतिस्पर्धी संघाला त्यांना रोखणे कठीण जाऊ शकते. तसेच त्यांची बचाव फळीही भक्कम आहे.

हरियाणा स्टीलर्स संघामध्ये सर्वाधिक लक्ष हे मोनू गोयतवर असणार आहे. तसेच त्याला वाझिर सिंग आणि विकास खंडोलाची साथ मिळेल, असे अपेक्षित आहे.

त्याचबरोबर बचाव फळीत सुरेंदर नाडा बरोबरच सचिन शिंगाडे, निरज कुमार आणि विकास अशा खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे हरियाणाचाही बचाव चांगला आहे.

या खेळाडूंकडे असेल लक्ष-

गिरीश एर्नाक हा प्रो कबड्डीमध्ये पहिल्यांदाच नेतृत्वाची धूरा सांभाळत आहे. त्यामुळे त्यालावर नेतृत्वाबरोबरच बचावातही चांगली कामगिरी करण्याचीही जबाबदारी आहे. त्याचबरोबर त्याला हरियाणा विरुद्ध खेळताना स्टार रेडर मोनू गोयातला रोखण्याची रणनीती अखावी लागणार आहे.

तसेच या सामन्यात पुण्याचा अष्टपैलू संदीप नरवालही कशी कामगिरी करतो याकडेही संर्वांचे लक्ष असणार आहे. तो पुण्याच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे.

त्याचबरोबर हरियाणा स्टीलर्सचा सुरेंदर नाडा हा पाचव्या मोसमातील सर्वाधिक यशस्वी बचावपटू ठरला होता. पण या सामन्यात त्याच्या समोर पुण्याच्या नितीन तोमरला थांबवण्याचे आव्हान आहे.

आमने सामने-

या दोन संघांमध्ये आत्तापर्यंत 4 सामने झाले असून त्यातील 2 सामने पुणेरी पलटनने जिंकले आहेत. तर एक सामना हरियाणाने जिंकला आहे. तसेच एक सामना हा बरोबरीचा झाला आहे.

प्रो कबड्डी- पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स सामन्याबद्दल सर्वकाही…

पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यात कधी होणार सामना?

पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यातील सामना 8 आॅक्टोबर 2018 ला होणार आहे.

कोठे होईल पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यातील सामना?

पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यातील सामना जवाहरलाल नेहरु स्टेडीयम, चेन्नई येथे होणार आहे.

किती वाजता सुरु होईल पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यातील सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8.00 वाजता  पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यातील सामन्याला सुरुवात होईल. 

पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यातील सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यातील सामना पाहता येणार आहे.

पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यातील सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

hotstar.com या वेबसाईटवर पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यातील सामना ऑनलाइन पाहता येईल.

यातून निवडला जाईल 7 जणांचा संघ-

पुणेरी पलटन- नितीन तोमर, विनोद कुमार, संजय श्रेष्ठ, परवेश, अक्षय जाधव, बजरंग, ताकामित्सू कोनो, संदीप नरवाल, राजेश मोंडल, मोरे जीबी, गिरीश एर्नाक(कर्णधार), विकास खत्री, रिंकू नरवाल, मोनू, अमित कुमार, रवी कुमार

हरियाणा स्टीलर्स- मोनू गोयत, सुरेंदर नाडा, विकास खंडोला. वाझिर सिंग, झाकिर हुसेन, प्रतिक, पॅट्रिक मुवाई, कुलदीप सिंग, मयुर शिवतारकर, निरज कुमार, विकास, अरुण कुमार एचएन, आनंद तोमर, भुवनेश्वर गौर, अमित सिंग, परविन, सचिन शिंगाटे, सुनील.

महत्वाच्या बातम्या-