खेलो इंडिया: जेरेमी, गुलामचे विक्रमांसह सुवर्णपदक

पुणे। मिझोरामचा जेरेमी लालरिन्हुंगा व उत्तराखंडचा गुलाम नवी यांनी विक्रम नोंदवित वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांनी अनुक्रमे १७ वषार्खालील व २१ वषार्खालील मुलांच्या गटातील ६७ किलो वजनी गटात हे यश मिळविले.

आशियाई कनिष्ठ स्पर्धेत पदकांची लयलूट करणा-या जेरेमी याने स्नॅचमध्ये १२२ किलो वजन उचलून गुलाम नवी याचा ११२ किलो हा विक्रम मोडला. त्याने क्लीन व जर्कमध्ये १५६ किलो आणि एकूणात २७८ किलो वजन उचलले. अरुणाचल प्रदेशच्या मार्किओ तारिओ याने स्नॅचमध्ये १०४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४२ किलो असे एकूण २४६ किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकाविले. आसामच्या त्रिदीप बरुआ याने ब्राँझपदक घेतले. त्याने स्नॅचमध्ये १०८ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १२७ किलो असे एकूण २३५ किलो वजन उचलले.

मुलांच्या २१ वषार्खालील ६७ किलो गटात गुलाम याने स्नॅचमध्ये १२० किलो वजन उचलीत स्वत: नोंदविलेला ११२ किलो हा विक्रम मोडला. त्याने क्लीन व जर्कमध्ये १५९ किलो असे एकूण २७९ किलो वजन उचलले आणि सोनेरी यश संपादन केले. एकूण वजन उचलण्याचाही विक्रम त्याने मोडला. यापूर्वी या स्पर्धेत जेरेमी याने युवा राष्ट्रीय स्पर्धेत २७८ गुणांची नोंद केली होती. मिझोरामच्या जेरेमी याला या विभागात रौप्यपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये १२२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १५६ किलो असे एकूण २७८ किलो वजन उचलले. आंध्रप्रदेशच्या के.नीलम राजू याला ब्राँझपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये ११२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४६ किलो असे एकूण २५८ किलो वजन उचलले.

मुलांच्या १७ वषार्खालील ६१ किलो गटात मिझोरामच्या झाकुमा याने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने स्नॅचमध्ये ११४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४० किलो असे एकूण २५४ किलो वजन उचलले. त्याचाच सहकारी जेकब व्हान्लाल्तालुंगा याने स्नॅचमध्ये ११४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३९ किलो असे एकूण २५३ किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकाविले. स्नॅचमध्ये ९८ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १२९ किलो असे एकूण २२७ किलो वजन उचलले. त्याला ब्राँझपदक मिळाले.

मुलांच्या २१ वषार्खालील विभागातील ६१ किलो वजनी गटात जेकब व्हान्लाल्तालुंगा याने सुवर्णभरारी केली. त्याने स्नॅचमध्ये ११४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३९ किलो असे एकूण २५३ किलो वजन उचलले. अरुणाचल प्रदेशच्या चारु पेसी याने स्नॅचमध्ये ९७ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३० किलो असे एकूण २२७ किलो वजन उचलले. त्याला रौप्यपदक मिळाले. मिझोरामच्या लालहुंतारा याला ब्राँझपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये ९५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १२६ किलो असे एकूण २२१ किलो वजन उचलले.

महत्त्वाच्या बातम्या – 

खेलो इंडिया: स्पोटर्स एक्स्पोमध्ये महाराष्ट्राचे क्रीडामंत्री कबड्डीच्या मैदानात

देशातील १ हजार खेळाडूंना दरवर्षी ५ लाख रुपये देणार – केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड