खेळाडू संघसहकाऱ्याच नावच विसरला, म्हणाला त्याला देवाने लवकर बरं करो

अॅडलेड। आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये रविवारी(23 डिसेंबर) अॅडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स संघात सामना पार पडला. या सामन्यात मेलबर्न संघाकडून मोहम्मद नबी आणि डॅनियल ख्रिस्टियन यांनी नाबाद 94 धावांची भागीदारी रचत मेलबर्न संघाला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला.

मात्र या सामन्यानंतर एक गमतीशीर गोष्ट पहायला मिळाली. सामन्यानंतर जेव्हा एका पत्रकार महिलेने नबीला प्रश्न विचारला की ख्रिस्टियन सामन्याआधी हॉस्पिटलमध्ये होता, त्यावर नबीने उत्तर दिले की ‘कोण, मला माहित नाही कोण आहे तो, सॉरी पण देव त्याला लवकर बरं करो आणि त्याला निरोगी स्वास्थ्य लाभो.’

या सामन्याआधी ख्रिस्टियनची तब्येत बिघडल्याने तो सकाळीच हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. पण त्यानंतर त्याने दुपारी आराम करुन मग या सामन्यासाठी खेळायला आला.

या सामन्यात अॅडलेड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 174 धावा केल्या होत्या आणि मेलबर्न संघासमोर 175 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मेलबर्न संघाने 82 धावांतच 5 विकेट्स गमावल्या होत्या.

पण त्यानंतर नबी आणि ख्रिस्टियन यांची जोडी मैदानावर आली. या दोघांनी नाबाद 94 धावांची भागीदारी करत मेलबर्न संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नबीने 30 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच ख्रिस्टियनने 27 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या:

ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, तीन खेळाडूंना वगळले

होय मी क्रिकेटमध्ये अजून नविन आहे, म्हणून एवढी मोठी चूक घडली

टीम इंडिया तिसरी कसोटी जिंकणारच, रहाणेने शोधली आहे नवीकोरी आयडीया