सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने

हैद्राबाद | काल हैद्राबाद विरुद्ध पंजाब सामन्यात हैद्राबादने १३ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. जरी या सामन्यात विजय हैद्राबादने मिळवला असला तरी या सामनावीर पुरस्कार हा पंजाबच्या खेळाडूला देण्यात आला. 

पंजाबच्या अंकित रजपूतने कालच्या सामन्यात ४ षटकांत १४ धावा देत त्याने चक्क ५ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये अनकॅपड खेळाडुने ५ विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

अंकित रजपूत सोडून आयपीएलच्या ११ हंगामात आजपर्यंत कोणत्याही अनकॅपड  खेळाडूने ५ विकेट्स घेतल्या नाहीत. यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतूक होत आहे. 

केवळ १४वा खेळाडू- 

आयपीएलमध्ये संघाचा पराभव होऊनही सामनावीर पुरस्कार मिळालेला अंकित रजपूत हा केवळ १४वा खेळाडू ठरला आहे.

यापुर्वी २००८मध्ये अॅल्बी माॅर्केल आणि एस गोस्वामी, २००९ युवराज सिंग आणि अनिल कुंबळे, २०१०मध्ये युसूफ पठाण, २०१२ मध्ये डेल स्टेन आणि सुनिल नारायण, २०१६मध्ये विराट कोहली, ख्रिस माॅरी, हशिम अमला आणि अॅडम झंपा तर २०१८मध्ये अंकित रजपूत या खेळाडूंना हे सामनावीर पुरस्कार मिळाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच

सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली