सचिन, गेलनंतर अशी कामगिरी करणारी ती ठरली तिसरीच क्रिकेटपटू

13 जून, बुधवारी पार पडलेल्या आयरलँड महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या 17 वर्षीय अॅमेलिया केरने द्विशतक करत महिला क्रिकेटमध्ये सर्वोच्च वयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम रचला.

याबरोबरच तिने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. तिने या सामन्यात फलंदाजी करताना 145 चेंडूत 232 धावा केल्या, तर गोलंदाजी करताना 7 षटकात 17 धावा देत 5 विकेटही घेतल्या.

एकाच सामन्यात अशी कामगिरी करणारी ती पहिलीच क्रिकेटपटू ठरली आहे.

तसेच वनडे कारकिर्दीत 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट आणि द्विशतक करणारी ती एकूण तिसरी क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी अशी कामगिरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि ख्रिस गेलने केली आहे.

सचिनने 24 फेब्रुवारी 2010 ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध द्विशतक केले होते. तर 1 एप्रिल 1998ला आॅस्ट्रेलिया विरुद्ध आणि 2 एप्रिल 2005ला पाकिस्तान विरुद्ध त्याने 5 विकेट घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे 5 वर्षांनंतर 2015 ला झालेल्या विश्वचषकात 24 फेब्रुवारीलाच द्विशतक केले होते. त्याने झिम्बाब्वे विरुद्ध 215 धावा केल्या होत्या. तसेच त्याने आॅस्ट्रेलिया विरुद्ध 1जून 2003 ला 5 विकेट घेण्याची कामगिरी केली होती.

वनडे कारकिर्दीत द्विशतक आणि 5 विकेट घेणारे खेळाडू:

सचिन तेंडूलकर

ख्रिस गेल

अॅमेलिया केर

महत्त्वाच्या बातम्या:

फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग

इंग्लंड क्रिकेटच्या चाहत्यांमुळे अाॅस्ट्रेलियन खेळाडू वैतागले

बापरे! क्रिकेटमध्ये घडला तब्बल ११८वर्षांमधील सर्वात मोठा विक्रम, भारतीय झाले त्याचे साक्षीदार