युवराज नाही तर हे आहेत जगातील ५ खरे सिक्सर किंग

मोहाली । काल किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात पार पडलेल्या सामन्यात पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ख्रिस गेलने शतकी खेळी करून पंजाबच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

त्याचबरोबर त्याने त्याची मुलगी ख्रिसलियानाला तिच्या वाढदिवसाची खास भेट म्हणून हे शतक तिला समर्पित केले आहे. तिचा आज (20एप्रिल) दुसरा वाढदिवस आहे.

त्याने काल झालेल्या सामन्यात त्याने चक्क ११ षटकार तर १ चौकार खेचले. यामूळे टी२० सामन्यांत डावात १० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार त्याने तब्बल १६ वेळा खेचले. गेलने आजपर्यंत ३२५ सामने खेळले असून त्यात त्याने ८३४ षटकार खेचले आहेत.

गेलप्रमाणे एका डावात १० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्याही खेळाडूला २ पेक्षा जास्त वेळा करता आला नाही. गेलने हा विक्रम चक्क १६वेळा करून मोठा विक्रमच केला आहे.

टी२० सामन्यांत डावात १० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारे खेळाडू-
१६- ख्रिस गेल
२- ब्रेंडन मॅक्कूलम
२- दसून शनाका
२-इविन लेविस
२- आंद्रे रसेल

महत्त्वाच्या बातम्या –