एकदिवसीय सामन्यांत १० हजार धावा, १०० बळी आणि १०० झेल घेणारे पाच खेळाडू

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आजवर नोंदवले गेले आहे. परंतु १० हजार धावा, १०० बळी आणि १०० झेल असा विक्रम केवळ पाच खेळाडूंना करता आला आहे. अष्टपैलू खेळाडूंसाठी ही पात्रता ठेवली तर आपल्याला यात आणखी दोन जर अष्टपैलू खेळाडू मिळतील.

सचिन तेंडुलकर
सचिनने एकदिवसीय सामन्यांत १५९२१ धावा, १५४ बळी आणि १४० झेल घेतले आहेत. या कामगिरीसाठी सचिन ४६३ एकदिवसीय सामने खेळला आहे.

सौरव गांगुली
गांगुली भारताकडून ३११ एकदिवसीय सामने खेळला असून त्याने बरोबर १०० झेल एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतले आहे. विशेष म्हणजे मध्यमगती गोलंदाज असणाऱ्या या खेळाडूने बळी देखील बरोबर १०० घेतले आहेत. तर फलंदाजी करताना ११३६३ धावा केल्या आहेत.

जॅक कॅलिस
ज्या खेळाडूला खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल तो म्हणजे आफ्रिकेचा जॅक कॅलिस. ३२८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना या खेळाडूने ११५७९ धावा करताना २७३ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत, तर क्षेत्ररक्षण करताना १३१ झेल घेतले आहेत.

सनथ जयसूर्या
श्रीलंका संघाचा माजी कर्णधार असणाऱ्या सनथ जयसूर्याने ४४५ सामन्यांत १३४३० धावा करत असताना गोलंदाजी विभागातही तब्बल ३२३ बळी मिळवले आहेत. १२३ झेल घेताना जागतिक क्रिकेटमध्ये जर कधी सर्वश्रेष्ठ अष्टपैलू कोण अशी यादी बनवली तर आपण त्यात अव्वल का असू याची झलकच दिली आहे.

तिलकरत्ने दिलशान
श्रीलंका संघाचा सलामीवीर आणि अष्टपैलू खेळाडू तिलकरत्ने दिलशान ३३० एकदिवसीय सामन्यांत ११८ झेल घेतले असून १०२९० धावा करताना १०६ बळी देखील घेतले आहे.