टॉप ३: १०० वनडे सामने खेळूनही एकही कसोटी सामना न खेळलेले खेळाडू

काल दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेश संघावर १० विकेट्सने विजय मिळवला. यात हाशिम अमलाने ११० तर डीकॉकने १६८ धावा केल्या. परंतु या सामन्यात असाही एक विक्रम झाला जो कोणत्याही खेळाडूला आपल्या नावावर झालेला आवडणार नाही.

काल आफ्रिकेच्या डेविड मिलरने आपल्या वनडे कारकिर्दीतील १००वा सामना खेळला. १०० सामने खेळूनही एकही कसोटी सामना खेळायला न मिळालेला मिलर हा केवळ तिसरा खेळाडू बनला आहे.

यापूर्वी अशी कामगिरी रोहित शर्माने केली होती. त्याला १०८ वनडे सामन्यानंतर पहिला कसोटी सामना खेळायची संधी मिळाली होती. आज रोहितच्या नावावर १६८ वनडे असून त्याला २१ कसोटी सामने खेळायला मिळाले आहेत.

या यादीत दुसऱ्या स्थानावर किरॉन पोलार्ड आहे. पोलार्डने १०१ वनडे सामने खेळला असून याही खेळाडूला आजपर्यंत एकही सामना खेळायला मिळाला नाही.

कालच्या सामन्यात मिलरला फलंदाजीची संधी मिळाली नाही परंतु एक झेल त्याने घेतला. या खेळाडूने आजपर्यंत वनडेत ३९च्या सरासरीने २३९६ धावा केल्या आहेत.

पहिला कसोटी सामना खेळण्यापूर्वी सर्वाधिक वनडे सामना खेळलेले खेळाडू
१०८ रोहित शर्मा
१०१ किरॉन पोलार्ड (अजूनही कसोटी पदार्पण नाही)
१०० डेविड मिलर (अजूनही कसोटी पदार्पण नाही)