टॉप- ५: जगातील हे दिग्गज क्रिकेटपटू चष्मा घालून खेळायचे क्रिकेट!

चष्मा घालून क्रिकेट खेळणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. क्रिकेटपटू खेळताना कोणताही अपघात होऊ नये म्हणून मोठी काळजी घेतात. त्यात पॅड, हेल्मेट, गार्ड वगैरे गोष्टींचा समावेश असतो. बारीक विचार केला तर चष्मा हा क्रिकेटपटूंसाठी क्रिकेट खेळताना धोकादायक ठरू शकतो. जर चेंडू सरळ चष्मावर बसला तर मोठी इजा होऊ शकते.

असे असतानाही काही क्रिकेटपटू हे मैदानावर सतत चष्मा घालून क्रिकेट खेळत असत. किंबहुना चष्मा आणि ते क्रिकेटपटू असं समीकरणच झालं होत. बर हे क्रिकेटपटू कुणी असे तसे क्रिकेटपटू नव्हते तर त्यांना आजही दिग्गज क्रिकेटर्स म्हणून ओळखलं जात. अशाच काही क्रिकेटपटूंचा हा परिचय !

१. डॅनियल व्हिटोरी
न्यूजीलँडचा महान खेळाडू अगदी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून चष्मा घालून क्रिकेट खेळत असे. त्याने संपूर्ण आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायम चष्मा घालूनच क्रिकेट खेळायला प्राधान्य दिल. ११३ कसोटी, २९५ वनडे आणि ३४ टी२० सामने तो खेळला. ज्यात त्याने एकूण ६९८९ धावा केल्या आहेत तर गोलंदाजी करताना ७०५ विकेट्स देखील घेतल्या आहेत. परंतु या सर्व सामन्यात त्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येताना कायम चष्मा घातला होता.

२. सौरव गांगुली
भारताचा दादा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा माजी कर्णधार सौरव गांगुलीही चष्मा वापरणारा क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो. हा खेळाडू कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कायम चष्मा घालत असे. परंतु नंतर त्याने लेन्स वापरायला सुरुवात केली. गंगूला याच कारणामुळे सतत डोळे मिचकावत असे. पुढे गांगुलीने मैदानावर लेन्स तर मैदानाबाहेर चष्मा वापरायला सुरुवात केली ती क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या शेवटच्या क्षणापर्यंत.

३.वीरेंद्र सेहवाग
वीरेंद्र सेहवाग सुरुवातीच्या काळात चष्मा वापरत नसे. परंतु कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात त्याने चष्मा वापरायला सुरुवात केली. तो सराव करताना नेहमी चष्मा वापरत असे. पुढे जाऊन त्याने क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी अशा दोनही आघाड्यांवर चष्मा वापरायला सुरुवात केली. सुरुवातील सेहवागला चष्मा घालून खेळणे, चेंडूच्या वेगाचा आणि टप्प्याचा अंदाज घेणे कठीण जात असल्याचं त्यानेच एका मुलाखतीमध्ये सांगितलं होत.

४.अनिल कुंबळे
सुरुवातीच्या काळात भारताचा हा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू चष्मा वापरत असे. कुंबळेचा कारकिर्दीतील अतिशय महत्वाच्या टप्प्यावर त्याने चष्मा घालून क्रिकेट खेळायला प्राधान्य दिले. पुढे हा क्रिकेटपटूने चष्म्याऐवजी लेन्स वापरायला सुरुवात केली ती अगदी निवृत्ती घेईपर्यंत.

५. क्लीव्ह लॉईड
वेस्ट इंडिज संघाचा हा दोन वेळचा विश्वविजेता कर्णधार क्लीव्ह लॉईड हा एका अपघातामुळे चष्मा वापरू लागला. वयाच्या १२व्या वर्षी झालेल्या भांडणामुळे पुढे ह्या खेळाडूला डोळ्यांना इजा झाली आणि त्याचमुळे त्याला पुढे चष्मा वापरावा लागला.

अन्य चष्मा वापरून क्रिकेट कारकीर्द घडवलेले खेळाडू
जेफ बॉयकॉट, झहीर अब्बास, दिलीप दोषी, नरेंद्र हिरवानी