टाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू

गेल्यावर्षी ३० आॅक्टोबर रोजी एमएस धोनी ३००वा वन-डे सामना खेळला. सध्या धोनीच्या नावावर ३२७ सामने आहेत.

जगात केवळ २० खेळाूडूंना वन-डेत ३०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली.

त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सर्वाधिक अर्थात ४६३, माहेला जयवर्धने (४४८), सनथ जयसुर्या (४४५) आणि कुमार संगकारने ४०४ वन-डे सामने खेळले. अन्य कोणत्याही खेळाडूला ४०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळता आले नाहीत.

याचाच अर्थ श्रीलंकेच्या तब्बल ३ खेळाडूंनी ४०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत.

भारताकडून ३०० हुन अधिक एकदिवसीय सामने खेळणारा युवराज ५वा तर धोनी ६वा खेळाडू होता. या यादीत सचिन ४६३, द्रविड ३४४, अझरउद्दीन ३३४, एमएस धोनी ३२७, गांगुली ३११ आणि युवराज सिंग ३०४ हे भारतीय खेळाडू आहेत.

३०० हुन अधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या देशांची यादी-
१. श्रीलंका ७
२. भारत ६
३. पाकिस्तान ३
४. दक्षिण आफ्रिका २
५. ऑस्ट्रेलिया २

या खेळाडूंची ३०० वन-डे सामने खेळण्याची संधी हुकली-
२९९- ब्रायन लारा
२९५- मार्क बाऊचर
२९५- डेनियल विटोरी
२८८- मोहम्मद युसुफ
२८७- अॅडम गिलख्रिस्ट

या खेळाडूंना आहे वन-डेत ३०० सामने खेळण्याची संधी-
२८४- ख्रिस गेल
२७१- शोएब मलिक
२३०- उपुल तरंगा
२२६- सुरेश रैना
२११- विराट कोहली

महत्त्वाच्या बातम्या-