ना सचिन, ना कपिल, ना धोनी… अशी कामगिरी केली आहे फक्त अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी!

बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातून अफगाणिस्तानने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

या पदार्पणाच्या सामन्यात अफगाणिस्तानचे नेतृत्व करणारा असघर स्टॅनिकझाई आणि अफगाणिस्तानकडून पहिली कसोटी विकेट घेणारा मोहम्मद नबी यांनी एक खास कामगिरी केली आहे. ते अफगाणिस्तानच्या वनडे, टी20 आणि कसोटी अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील अफगाणिस्तान संघाच्या पदार्पणाच्या सामन्यात खेळले आहेत.

याआधी अशी कामगिरी आयरलँडच्या तीन खेळाडूंनी केली आहे. यात विल्यम पोर्टरफील्ड, निल ओब्रायन, केविन ओब्रायन हे खेळाडू आहेत.

अफगाणिस्तानने त्यांचा पहिला वनडे सामना स्कॉटलंड विरुद्ध 19 एप्रिल 2009ला खेळला तर पहिला टी 20 सामना 1 फेब्रुवारी 2010ला आयरलँडविरुद्ध खेळला आहे.

आयरलँड आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांच्या संघाला 2017 मध्ये आयसीसीचा पूर्ण सदस्य होण्याचा मान मिळाला आहे.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील संघाच्या पदार्पणाच्या सामन्यात खेळणारे खेळाडू:

विल्यम पोर्टरफील्ड

निल ओब्रायन

केविन ओब्रायन

(आयरलँड: वनडे पदार्पण-5 आॅगस्ट 2006, टी20 पदार्पण-2 आॅगस्ट 2008, कसोटी पदार्पण-11मे 2018)

मोहम्मद नबी

असघर स्टॅनिकझाई

(अफगाणिस्तान: वनडे पदार्पण-19 एप्रिल 2009, टी20 पदार्पण-1 फेब्रुवारी 2010, कसोटी पदार्पण-14 जून 2018)

महत्त्वाच्या बातम्या:

सलामीविर मुरली विजयचे शानदार शतक

टाॅप ३- या भारतीय ओपनरने केली आहेत कसोटीत सर्वाधिक शतके

फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग