पंतप्रधान मोदींची धोनीला विनंती, कृपया एवढं काम करच

रविवारी(10 मार्च) निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता निवडणूकांसाठी सर्वपक्षांची तयारी सुरु झाली आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नागरिकांना यावेळी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी ट्विटरवरुन आवाहन केले आहे.

तसेच मोदींनी भारतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनीही मतदानाबद्दल नागरिकांना जागरुक करण्याची विनंती केली आहे. या व्यक्तिमत्त्वांमध्ये भारतीय क्रिडाजगतातील खेळाडूंचाही समावेश आहे.

मोदींनी भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटपटू एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही विनंती करताना म्हटले आहे की ‘धोनी, कोहली आणि रोहित तूम्ही क्रिकेटच्या मैदानात नेहमीच मोठे विक्रम करत असता पण यावेळी अगामी निवडणूकांमध्ये 130 कोटी भारतीय नागरिकांना सर्वोच्च मतदान करण्याबद्दल प्रेरित करा. जेव्हा हे होईल तेव्हा लोकशाहीचा विजय होईल.’

याबरोबरच मोदींनी अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि विरेंद्र सेहवाग या माजी क्रिकेटपटूंना विनंती करताना म्हटले आहे की ‘तूम्ही क्रिकेटच्या खेळपट्टीवर केलेल्या कामगिरीने लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. या, यावेळीही लोकांना पुन्हा प्रेरित करु पण सर्वोच्च मतदान करण्यासाठी.’

मोदींनी क्रिकेटपटूंनाच नाही तर विविध क्षेत्रातील दिग्गजांनाही ही विनंती केली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, एआर रेहमान यांना टॅग करत ही विनंती केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की ‘जेव्हा सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि एआर रेहमान काही सांगतात तेव्हा सर्व देश त्याची दखल घेतो. मी प्रामाणिकपणे या व्यक्तिमत्त्वांना विनंती करतो की त्यांनी नागरिकांना 2019 च्या निवडणूकांसाठी मतदान करण्यासाठी प्रेरित करावे.’

क्रिकेटपटूंबरोबर मोदींनी निरज चोप्रा, योगेश्वर दत्त, सुशील कुमार, किदांबी श्रीकांत, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, फोगट बहिणी अशा क्रिडापटूंनाही ही विनंती केली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणूका सात टप्प्यात होणार असून यासाठी 11 एप्रिलला मदतानाला सुरुवात होणार आहे. तर 19 मे ही मतदानाची अंतिम तारिख आहे. मतमोजणी 23 मेला होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

जेव्हा बाॅलीवूडचा महान अभिनेता सुनील शेट्टी देतो रिषभ पंतला जोरदार पाठींबा

आयपीएलपूर्वी केकेआरसाठी खुशखबर, या खेळाडूने एकाच ओव्हरमध्ये मारले ५ षटकार

हिटमॅन रोहित शर्माला तो खास पराक्रम करण्याची अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही…