पीएमडीटीए तर्फे पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज २०१९ चे आयोजन

येत्या वर्षभरात विविध ठिकाणी १२ व १४ वर्षाखालील वयोगटात स्पर्धा रंगणार

पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे १२ व १४ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मालिकेत १० पीएमडीटीए मानांकन टेनिस स्पर्धांचा समावेश असून या स्पर्धा एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडणार असून मास्टर्स वर्षाच्या शेवटी होणार आहे. मास्टर्स स्पर्धेत प्रत्येक वयोगटांतील अव्वल ८ खेळाडू खेळणार आहे.
पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून १२ व १४ वर्षाखालील गटातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळावी आणि टेनिसचा प्रसार व्हावा, हा या मागचा उद्देश आहे.
पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे आणि खजिनदार कौस्तुभ शहा यांनी सांगितले कि, युवा व गुणवान खेळाडूंना हेरून त्यांच्या गुणवत्तेत विकास व्हावा, या दृष्टीने आम्ही १२ व १४ वर्षाखालील गटातील या मालिका टेनिस स्पर्धेला पाठिंबा देत आहोत. भविष्यात हेच खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील आणि पुण्यामधील खेळाडू हा ग्रँड स्लॅम विजेता बनेल, अशी अशा आहे.
मास्टर्स स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येणार असून विजेत्या खेळाडूला १५०००रुपये, तर उपविजेत्याला १००००रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला ५०००रुपये  अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. कुमार चॅम्पियनशिप सिरीज २०१९ स्पर्धेची पहिली मालिका महाराष्ट्रीय मंडळ येथे २० एप्रिलपासून सुरु होणार आहे.