“कोहली कोहली” कर्णधार कोहलीवरील हे उस्फुर्त काव्य…!!!

0 315

-गोपाळ गुंड

विराट म्हणजे कोहली विराट
जणू फलंदाजीचा सम्राट
धावांची करी लयलूट
चौकार, षटकार मारुनी

काही न चाले डिव्हिलीयर्सचे
रबाडाचेही झाले लोणचे
हात पोळले आमलाचे
कोहली, कोहली म्हणुनिया

कोहली जळी आणि स्थळी
कोहली काष्टी आणि पाषाणी
गोलंदाजांची धज्जी उडवुनी
कुरुवाळीतसे दाढीला

शतकावर शतके रचित
मोठेच अवसान शरीरात
देहबोली ती करी घात
प्रतिस्पर्धी तये हबकतो

चेंडूला दया, माया, कुरवाळणे
गोलंदाजाला टरकून असणे
ऐसे शब्दही कोशात नसणे
नाव त्याचे कोहली

त्याची झाली मोठी गारुडे
किती किती गावे पवाडे
इंडिया इंडिया करिती थोबाडे
अगतिक किती टीम त्या

काळी एका सनी,सचिन
सांप्रती कोहली खेचे ध्यान
तिघेही असती परी महान
आपापल्या काळी ते

(विराट कोहलीच्या आजच्या दमदार खेळीनंतर आमच्या एका वाचकाने पाठवलेले हे एक उस्फुर्त काव्य…)

 

Comments
Loading...
%d bloggers like this: