रवींद्र जडेजाची पुन्हा वादग्रस्त पोस्ट

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असतो. तो संघात असो किंवा नसो तो सोशल मीडिया किंवा सार्वजनिक जीवनातील अशा काही गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत येतो.

पहिल्या तीन वनडेत जखमी अक्सर पटेलच्या जागी भारतीय संघात स्थान मिळूनही ह्या खेळाडूला प्रत्यक्ष सामन्यात खेळता आले नाही. पुढच्या २ वनडेत या खेळाडूला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. परंतु तरीही खेळाडू जोरदार चर्चेत आला आहे.

रवींद्र जडेजा फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून काही ना काही वाद ओढवून घेतो. असाच वाद त्याने इंस्टाग्राम पोस्टमुळे ओढवून घेतला आहे.

जडेजा त्याने प्रसिद्ध केलेल्या फोटो बरोबर म्हणतो, “माझ्या पोलीस रिपोर्टप्रमाणे कालचा नाईट आऊट भारी होता.”
Had a really great “Night Out” last night, according to my police report.#rajputboy.”

यापूर्वीही ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरु होण्यापुवी संघात स्थान न मिळाल्यामुळे जडेजाने वादग्रस्त ट्विट केला होता. परंतु नंतर त्याने तो ट्विट डिलीट केला होता.

गुरुवारी अर्थात २८ तारखेला मालिकेतील चौथा सामना बंगलोरच्या चिन्नस्वामी मैदानावर खेळण्यात येणार आहे.