…म्हणून पोलार्डने रागाने हवेत फेकली बॅट, पहा व्हिडिओ

हैद्राबाद। आज(12 मे) आयपीएल 2019मधील अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स समोर विजयासाठी 20 षटकात 150 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबईकडून अष्टपैलू किरॉन पोलार्डने सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या. पण तो फलंदाजी करत असताना एकावेळी त्याने रागाने बॅट हवेत फेकली होती.

झाले असे की मुंबई इंडियन्स फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्सकडून ड्वेन ब्रावो गोलंदाजी करत होता. यावेळी ब्रावोने तिसरा चेंडू क्रिज लाईनच्या थोडा बाहेर यॉर्कर टाकला. हा चेंडू वाईड असल्याचे समजून पोलार्डने तो चेंडू यष्टीरक्षक एमएस धोनीकडे जाऊन दिला. मात्र मैदानावरील पंच नितिन मेननने हा चेंडू वाईड दिला नाही.

त्यामुळे पोलार्डने त्याची बॅट हवेत फेकली. त्यानंतर तो पुढील चेंडूवर क्रिजच्या खूप बाहेर उभा राहिला आणि नंतर फलंदाजी करण्यापासूनही बाजूला झाला. पण त्याची ही कृती पाहुन पंच इयान गुल्ड आणि नितिन मेनन यांनी त्याला पुन्हा तसे न करण्यास सांगितले.

त्यापूर्वी या षटकातील पहिल्या चेंडूवर पोलार्डने जोरदार फटका मारला होता. पण चेडू बाउंड्री लाईनच्या पार जाण्यापासून अंबाती रायडूने रोखले. यावेळी पोलार्डनेही स्ट्राईक स्वत:कडे ठेवण्यासाठी एकही धाव घेतली नाही.

तर दुसरा चेंडू ब्रावोने धिम्या गतीने फुल लेंन्थने टाकला पण हा चेंडूही क्रिजच्या बाहेर होता. परंतू पोलार्ड यावेळी ऑफ स्टम्पच्या बाहेर होता. त्यामुळे पंचांनी वाईड दिला नाही. त्यानंतरच्या चेंडूवर मात्र पंचांनी चेंडू लाईनच्या बाहेर असूनही वाईड न दिल्याने पोलार्डने त्याची नाराजी व्यक्त केली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

चक्क चाहत्याने मुंबई इंडियन्सला सुचवली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध जिंकण्याची योजना

आयपीएल २०१९: अंतिम सामन्यासाठी मुंबई-चेन्नईचे असे आहेत ११ जणांचे संघ

चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स आणि अंतिम सामना, असे आहे खास नाते…