तिने घडवला महिला क्रिकेटमध्ये इतिहास, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला येत केला मोठा पराक्रम

अायसीसी वूमेन चॅंपीयनशीप स्पर्धेत आज भारतीय महिला संघ आणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात अाज एक खास विक्रम झाला. 

एका बाजूने संपुर्ण संघ हार मानत असताना पूजा वस्त्राकार या खेळाडूने ९व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ५६ चेंडूत ५१ धावा केल्या. महिला क्रिकेटमध्ये ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता तिच्या नावावर झाला आहे. 

यापुर्वी हा विक्रम लकी डूलन या खेळाडूच्या नावावर होता. तिने २००९मध्ये न्यूझीलॅंडकडून खेळताना इंग्लड विरूद्ध ४८ धावा केल्या होत्या. 

पूजा वस्त्राकारच्या याच खेळीच्या जोरावर आज भारतीय संघाने अाॅस्ट्रेलिया ५० षटकांत सर्वबाद २०० धावा केल्या आहेत. अन्य भारतीय खेळाडूंमध्ये केवळ सूषमा वर्मा (४१) आणि पूनम राऊत (३७) यांना समाधामकारक कामगिरी करता आली.