इंग्लंडच्या महिला क्रिकेटरला विराटने दिली बॅट गिफ्ट !

 

नुकतेच वनडे क्रिकेटमध्ये ३० शतके करणारा विराट कोहलीवर संपूर्ण जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराट कोहली हा आता क्रिकेटच्या तीनही प्रकारात जगातील सर्वोत्तम क्रिकेटर बनला आहे.

तसे तर त्याच्या या विक्रमासाठी जगभरातील अनेक क्रिकेटपंडिताकडून त्याला शुभेच्छा मिळाल्या आहेतच पण त्याच्या एका खास फॅनने ही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत, ती फॅन म्हणजे इंग्लंडचा महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट.

डॅनियलने तिचे विराटवर किती प्रेम आहे हे वेळोवेळी सोशल मीडियावर दाखवून दिले आहे. अनेक प्रसंगी इंगलंडच्या या २८ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले आहे.

२०१४ मध्ये जेव्हा भारताने इंग्लंडचा दौरा केला तेव्हा डॅनियल आणि विराट भेटले होते. तेव्हा विराटने तिला स्वतःची बॅट गिफ्ट केली होती. सोमवारी डॅनियलने ट्विटरवर एक फोटो शेयर केला ज्यात तिने विराटकडून मिळालेल्या बॅटचा फोटो दिला होता. या बॅटच्या खालच्या बाजूला विराटचे नाव लिहलेले दिसते.

या आधीही डॅनियलने आपले विराट बद्दलचे प्रेम व्यक्त करत ट्विटरवर कोहली माझ्याबरोबर लग्न कर असे ट्विट केले होते.

इंग्लंडची ही अष्टपैलू क्रिकेटपटू नुकताच झालेल्या इंग्लंडच्या आयसीसी महिला विश्वचषकच्या विजेत्या संघाचा भाग ही होती. डॅनियल ही कमी काळात इंग्लंड संघाची अविभाज्य सदस्य म्हणून उदयास आली आहे, परंतु अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये तिला प्रभाव पाडणे बाकी आहे. या वर्षीच्या ऍशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांवर आता ती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल.