आजपासून प्रभादेवीत कुमार गट कबड्डीची धूम!

श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाने मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने आज दि.४फेब्रु. ते ७फेब्रु.२०१९ या कालावधीत कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजाभाऊ साळवी उद्यान-प्रभादेवी येथील “स्व.शांताराम (बाळा) तळवडेकर क्रीडांगरीत होणाऱ्या या स्पर्धेत मुंबईतील १६ नामवंत संघांना सहभाग देण्यात आला आहे.सामने सायंकाळच्या सत्रात एका मातीच्या मैदानावर प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील.

स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघास रोख रु.सात हजार एकशे चौऱ्यान्नव(₹ ७,१९४) व “मनसे” चषक प्रदान करण्यात येईल.उपविजयी संघास चषक व रोख रु.पाच हजार एकशे चौऱ्यान्नव(₹५,१९४) देण्यात येतील. उपांत्य उपविजयी दोन्ही संघाना प्रत्येकी चषक व रोख रक्कम इनाम देण्यात येईल. शिवाय दिवसाचा मानकरी, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, चढाई व पकड आदींना देखील आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.

स्पर्धेचे उदघाटन सोम. दि. ४फेब्रु. रोजी सायं. ६-३०वा. माजी आमदार नितीन सरदेसाई, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, संदीप देशपांडे, रिटाताई गुप्तां, स्नेहल जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले असे निमंत्रक यशवंत किल्लेदार व आयोजक उमेश गावडे यांनी प्रसार माध्यमांना या पत्रकाद्वारे कळविले आहे.