१९ वर्षीय चुलत भाऊ आयपीएलमध्ये करोडपती

जयपुर | आयपीएल २०१९लिलावात आज दोन चुलत भावांना चांगलीच किंमत मिळाली. त्यात प्रभसिमरन सिंगला पंजाबने तब्बल ४.८० कोटी रुपयांना संघात घेतले. तर अनमोलप्रीत सिंगला मुंबई इंडियन्सने ८० लाख रुपयात आपल्या ताफ्यात सामील केले.

अनमोलप्रीत सिगंचा जन्म २८ मार्च १९९८ चा असून पंजाबच्या अंडर १९ तसेच अंडर २३ संघाकडून खेळला आहे. तसेच प्रथम श्रेणी तसेच अ दर्जाचेही तो सामने खेळला आहे.

प्रभसिमरनला केवळ अ दर्जाचे सामने खेळण्याची पंजाबकडून संधी मिळाली आहे. तसेच तो भारताकडून अंडर १९चे क्रिकेटही खेळला आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी  प्रभसिमरनची अंडर १९ टीम इंडियात निवड न झाल्यामुळे तो चांगलाच नाराज झाला होता. याच काळात त्याने पंजाबमधील एका स्पर्धेत चक्क २९८ धावांची खेळी केली.

प्रभसिमरन विरेंद्र सेहवागला आपला आदर्श मानतो आणि आता सेहवागच मेंटाॅर असलेल्या संघात त्याची निवड झाली आहे. त्याला भविष्यात टीम इंडियाकडून खेळायचे आहे.

जेव्हा प्रभसिमरनने ही २९८ धावांची खेळी केली तेव्हा दुसऱ्या बाजूला त्याचा चुलत भाऊ अनमोलप्रीत होता आणि त्या दोघांमध्ये तेव्हा २३९ धावांची भागीदारी झाली होती.

अनमोलप्रीत हा प्रभसिमरनपेक्षा एक वर्षानेच मोठा आहे. आपल्या कारकिर्दीच श्रेय प्रभसिनरन अनमोलप्रीतला देतो.

महत्त्वाच्या बातम्या:

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आतापर्यंत हे ३ मोठे खेळाडू

आयपीएल २०१९ लिलाव: युवराजसह या ५ महान खेळाडूंना नाही कुणीही वाली

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप १० खेळाडू