प्रदीप नरवालकडून प्रो कबड्डीमध्ये मोठा विक्रम

0 273

पुणे : शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्पलेक्स बालेवाडी येथे सुरु असलेल्या प्रो कबड्डीच्या पुणे लेगमध्ये पटणा पायरेट्सचा कर्णधार डुबकी किंग प्रदीप नरवाल याने सामन्याच्या पहिल्या सत्रात तीन गुण मिळवत प्रो कबड्डीच्या एका मोसमात २५० रेडींग गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे.

पटणाच्या पहिल्या रेडमध्ये प्रदीप बाद झाला होता. त्यानंतर त्याला सहा मिनिटे मैदानाबाहेर बसावे लागले होते. जेव्हा पटणाचा पूर्ण संघ बाद झाला त्यावेळेसच तो पुन्हा मैदानात आला. त्यानंतर त्याने एम्प्टी रेड केली.

संघातील दुसरा मुख्य रेडर मोनू बाद झाल्याने तो तो रेडींगला आला. त्यावेळी त्याने दोन खेळाडूंना बाद केले. त्यानंतरच्या रेडमध्ये त्याने बोनस घेत त्याने एका मोसमात २५० रिडींग गुण मिळवण्याचा विक्रम केला.

एका मोसमात सर्वाधिक गुण घेण्याचा विक्रम आता प्रदीपच्या नावावर असून एका मोसमात २५० गुण घेणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: