एका मोसमात सर्वाधीक गुणांचा विक्रम झाला प्रदीप नरवालच्या नावावर

प्रो कबड्डीमधील एका मोसमात सर्वाधिक गुण मिळवण्याच्या विक्रम जो मागील चारही मोसम अबाधित होता तो पाचव्या मोसमात मोडला गेला आहे. अनुप कुमारच्या नावे असणारा तो विक्रम प्रदीप नरवालने मोडला आहे. अनुपने १६ सामन्यात खेळताना १६९ गुण मिळवले होते. प्रदीपने पाचव्या मोसमात १३ सामने खेळताना १७८ गुण मिळवत हा विक्रम मोडला.

१५ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात प्रदीप नरवालने अनुप कुमारचा एका मोसमात सर्वाधीक १५५ रेडींग गुण मिळवण्याचा विक्रम मोडला होता. त्याच्या दुसऱ्याचा दिवशी म्हणजे १६ सप्टेंबरला त्याने अनुप कुमारच्या नावे असणारा एका मोसमात सर्वाधीक गुण मिळवण्याचा विक्रम मोडला. कालच्या सामन्यात त्याने या १५ गुण मिळवत अनुपचा विक्रम मोडला आहे.

प्रो कब्बडीचा मुक्काम सध्या रांचीमध्ये आहे. रांची हे पटणा पायरेट्स संघाचे घरचे मैदान आहे. त्यामुळे पाटणा संघाचे सलग सामने आहेत. आजच्या सामन्यात जर त्याने सुपर टेन मिळवला तर तो अनुप कुमारचा आणखी एक विक्रम सलग दिवसात मोडणार आहे. अनुप कुमार आणि प्रदीप नरवाल यांच्या नावावर एका मोसमात सर्वाधीक १० सुपर टेन करण्याचा विक्रम आहे.एका मोसमात सर्वाधिक सुपर टेन करणाऱ्याच्या यादीत हे दोन खेळाडू संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. आज जर परादीप नरवालने सुपर टेन मिळवला तर सलग तीन दिवसात तो अनुपचे पहिल्या मोसमातील तीन विक्रम मोडेल.