१००९ धावांचा विक्रम करणारा प्रणव धनावडे स्कॉलरशिपच्या प्रतिक्षेत

प्रणव धनावडे याने जानेवारी २०१६  मध्ये मुंबईत झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत १००९ धावांचा विक्रम केला. आजवर प्रणव हा एवढी धावसंख्या करणारा जगातला पहिला खेळाडू आहे.

प्रणवने हा विश्वविक्रम केल्यानंतर जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि त्यातच मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रणवला स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतला. निर्णयाप्रमाणे प्रणवला पाहिल्यावर्षाची स्कॉलरशिप देण्यात आली. पण आता दुसर्‍या वर्षाची स्कॉलरशिप मिळणार की नाही याचा ठोस पुरावा प्रणवकडे अजूनतरी आलेला नाही. वर्षं सुरू होऊन ६ महिने उलटले तरीही स्कॉलरशिप देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

प्रणवने हा विश्वविक्रम केल्यानंतर एमसीएने प्रणवला ५  वर्षांसाठी दरमहा १०००० रुपये देण्यात येतील असे घोषित केले होते. यावर एमसीएचे म्हणणे आहे की प्रणवला जेव्हा स्कॉलरशिप देण्यात आली तेव्हा त्यामध्ये असेही लिहिले होते की दरवर्षी स्कॉलरशिप देण्याअगोदर त्याची गुणवत्ता तपासली जाईल.

प्रणवची गुणवत्ता तपासणी झाल्यानंतर मॅनेजमेंट टीमकडून फोन किंवा पत्र आल्यानंतररच ठरवण्यात येईल की त्याला पुढील वर्षासाठी स्कॉलरशिप मिळणार की नाही, असे एमसीएचे जाॅइंट सेक्रेटरी ‘उनमेश खानविलकर’ म्हणाले.

– उद्धव प्रभू (टीम महा स्पोर्ट्स)