प्रताप मंडळ कबड्डी स्पर्धेत भवानीमाता, शिवप्रेरणा अंतिम फेरीत दाखल

भवानीमाता, शिवप्रेरणा यांनी प्रताप क्रीडा मंडळ आयोजित ” स्व. सौ. गीताश्री गणेश चव्हाण चषक ” कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. हिंदमाताचा मनोज राणे आजच्या दिवसाचा मानकरी ठरला. प्रभादेवी येथील स्व. राजाराम साळवी उद्यानातील क्रीडांगणावर झालेल्या द्वितीय श्रेणीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भवानीमाताने सिद्धीप्रभाचे आव्हान ३४-२६असे संपवित अंतिम फेरी गाठली.

सुशांत धाडवे व संतोष सावंत यांच्या चढाई-पकडीच्या झुंजार खेळाने भवानीमाताने पहिल्या डावात विरुद्ध संघावर २लोण देत २१-०६ अशी मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने कूच केली होती. दुसऱ्या डावात सावध खेळ करीत त्यावर शिक्कामोर्तब केले.

दुसऱ्या डावात भवानीमाताने ३ अव्वल पकड देखील केल्या. ओमकार ढवळे, मिलिंद पवार यांनी उत्तरार्धात काट्याची लढत देत सामन्यात चुरस आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका लोणची परतफेड देखील केली. पण संघाला विजयी करण्यात मात्र ते अपयशी ठरले.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिवप्रेरणाने हिंदमाताचा प्रतिकार २८-०९असा सहज मोडून काढत अंतिम फेरीत खेळण्याचा मान पटकाविला. मध्यांतराला १६-०८अशी आघाडी घेणाऱ्या शिवप्रेरणाने उत्तरार्धातही त्याच जोशात खेळ करीत विरुद्ध संघाला डोकं वर काढू दिले नाही. सुनील करुंगलेकर यांनी एकदा ४, तर एकदा २ गडी टिपत या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला शैलेश भुरवणे यांनी बचावाची बाजू भक्कमपणे सांभासळत उत्तम साथ दिली. त्यामुळे हा विजय सहज शक्य झाला.

हिंदमाताच्या मनोज राणे, ऋषिकेश डिचोलकर यांनी पूर्वार्धात बरी लढत दिली. उत्तरार्धात मात्र ते पुरते ढेपाळले. या डावात त्यांनी अवघा एक गुण मिळविला. शिवप्रेरणाने दोन्ही डावात एक-एक लोण देत या सामन्यावर आपले वर्चस्व राखले.

या अगोदर झालेल्या उपांत्य पूर्व सामन्यात हिंदमाताने जय ब्राम्हणदेवचा मध्यांतरातील ०७-१८अशा ११गुणांच्या पिछाडीवरून ३०-२५असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली होती. मनोज राणे, ऋषिकेश डिचोलकर यांच्या भन्नाट खेळाला जाते.

महत्त्वाच्या बातम्या:

किंग कोहलीने मोडला ब्रेंडन मॅक्यूलमचा विक्रम, शोएब मलिकचाही विक्रम आहे धोक्यात

रोहित शर्माच्या ‘विराट’ विश्वविक्रमाशी कर्णधार कोहलीने केली बरोबरी

विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा आॅस्ट्रलियावर 6 विकेट्सने विजय

हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’