पहिल्या वनडे सामन्यात या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकल्याने भारतीय संघाचा विश्वास दुणावला आहे. आता या दोन्ही संघांनी वनडे मालिकेकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, शिखर धवन, युजवेंद्र चहल हे खेळाडू परतले आहेत.

त्यामुळे आता पहिल्या वनडे सामन्यासाठी अंतिम 11 जणांच्या संघात कोणाला संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या खेळाडूंना मिळू शकते अंतिम 11 जणांच्या संघात संधी – 

सलामीवीर – रोहित शर्मा आणि शिखर धवन

भारतासाठी मागील काही वर्षात रोहित आणि शिखर यांनी सलामीला फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. तसेच या दोघांना ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा अनुभवही आहे. शिखरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 मालिकेत पहिल्या सामन्यात 76 धावांची आक्रमक खेळी केली होती. तसेच तिसऱ्या टी20 सामन्यात त्याने 41 धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर रोहितचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतही चांगला फॉर्म पहायला मिळाला. त्याने मेलबर्न कसोटीत नाबाद अर्धशतक केले होते. त्यामुळे हे दोघे पहिल्या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे.

मधली फळी – विराट कोहली, अंबाती रायडू, एमएस धोनी

भारताचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झालेल्या विंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत चांगलाच फॉर्ममध्ये होता. तसेच त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत शेवटच्या सामन्यात 61 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याची चांगली कामगिरी झाली होती. त्यामुळे या मालिकेतही त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे.

अंबाती रायडूने मागील काही महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याने विंडिजविरुद्धही शतक करत चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले होते. मात्र ऑस्ट्रेलियन भूमीवर तो कशी कामगिरी करतो हे पहावे लागणार आहे.

भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनी मागील काही सामन्यांपासून धावा करण्यासाठी झगडत आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे यावेळी सर्वांचेच लक्ष असणार आहे. तो भारतीय संघातील सध्या सर्वात अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला होणार आहे.

परंतू याबरोबरच त्याची मधल्या फळीतील कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.  तसेच तो यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळणार आहे. यष्टीरक्षण करताना त्याची कामगिरी चांगली झाली आहे.

अष्टपैलू – हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा

भारताकडे अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांचे चांगले पर्याय आहेत. तसेच हे दोघेही भारताची तळातली फलंदाजी सांभाळू शकतात.

हार्दिकला सप्टेंबरमध्ये झालेल्या एशिया कपमध्ये दुखापतीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर तो पहिल्यांदाच भारतीय संघात खेळताना दिसू शकतो. त्याने दुखापतीनंतर रणजीमध्ये बडोदाकडून खेळताना मुंबईविरुद्ध चांगली अष्टपैलू कामगिरी केली होती.

तसेच जडेजा फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतो. त्याचबरोबर त्याची तळातील आक्रमक फलंदाजी महत्त्वाची ठरु शकते. त्याने सिडनी कसोटीतही ऑस्ट्रेलिया विरुद्ध 81 धावांची खेळी केली होती.

गोलंदाज – भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि खलील अहमद

ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्यामुळे वनडे मालिकेतही त्यांच्याकडून ही अपेक्षा असेल. चायनामन गोलंदाज कुलदीपने सिडनी कसोटीत 5 विकेट घेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याला जडेजाची फिरकी गोलंदाजीमध्ये साथ मिळेल.

वेगवान गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर, शमी आणि खलील यांना सांभाळावी लागणार आहे. शमीने कसोटीमालिकेत सर्वांना प्रभावित केले आहे.

तसेच भुवनेश्वरला जरी कसोटी मालिकेत संधी मिळाली नसली तरी त्याने टी20 मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तसेच जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित त्याच्यावर चांगल्या कामगिरीची जबाबदारी असणार आहे.

खलील हा संघात नवीन असला तरी त्याने भारताकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने 6 वनडे सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान

देशात या २० शहरांमध्ये होणार २०१९चे आयपीएल

२०१९ विश्वचषकासाठी कोणत्याही खेळाडूच्या जागेबद्दल नाही खात्री!