लीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार

इजिप्तचा स्टार फुटबॉलपटू मोहम्मद सलाह याने वाहतुकीचे नियम तोडल्याचा व्हिडिओ अॉनलाईन व्हायरल झाल्यावर लीव्हरपूलने पोलिसांकडे सलाह विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे.

गाडी सिग्नलला थांबली असता मोबाईल हाताळतानाचा सलाहचा हा व्हिडिओ अॉनलाईन चांगलाच व्हायरल झाला आहे. लीव्हरपूलच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सलाहशी चर्चा केल्यानंतर हा व्हिडिओ पोलिसांना दिला.

रविवारीच (12 ऑगस्ट) प्रीमियर लीगच्या सामन्यात लीव्हरपूलने वेस्ट हॅमचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिलाच गोल सलाहने केला होता. हा सामना झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली.

“आम्हाला या व्हिडिओबद्दल माहित होते. तसेच एका विभागातून तो आमच्याकडे आला”, असे ट्विट करत पोलिसांनी लीव्हलपूलचे आभार मानले आहे.

युकेमधील वाहतुकीच्या नियमानुसार गाडी चालवताना किंवा सिग्नलला गाडी थांबली असता मोबाईल वापरणे हे नियमांच्या विरोधात आहे.

तसेच या प्रकारामुळे सलाहला 1300 डॉलरचा दंड झाला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली

टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण