महिला विश्वचषक २०१७: उपांत्य फेरीत भारत ऑस्ट्रेलिया आज आमने सामने !

एक आठवड्यापूर्वी जेव्हा भारताला ऑस्ट्रेलियाने आठ विकेट्सने पराभूत केले तेव्हा ऑस्ट्रेलियाने दाखवून दिले की त्यांना या विश्वचषकाचे दावेदार का मानले जाते. ऑस्ट्रेलियाने कॅनडावर मात करून उपांत्य फेरी गाठली आहे, तर न्यूझीलंडविरूद्ध भारताने नशिबाची लढाई जिंकून उपांत्य फेरीतील टिकीट निश्चित केले आहे.

मिथाली राजच्या मते हे मैदान भारताच्या घरच्या मैदानासारखंच आहे. या मैदानावरील भारताने चारही सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये इंग्लंडविरुद्धचा स्पर्धेचा सलामीचा सामना आणि न्यूझीलंडविरूद्ध उपांत्य सामन्याला पात्रता ठरवणार सामना आहे. ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेत प्रथमच या मैदानावर खेळणार आहे. भारत या मैदानावर अजून अपराभूत आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत आहे आणि याचा पुरेपूर फायदा घेत भारताने आतापर्यंत २४ बळी घेतले आहेत.

महत्वाची आकडेवारी
१. या विश्वचषक स्पर्धेत पेरीची व लॅनिंगची फलंदाजी सरासरी ९१.५० आणि १०९ .३३ आहे.
२. या विश्वचषकात टॉप १० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत डावखुरी फिरकी गोलंदाज जेस जोनासन, लेग स्पिनर क्रिस्टन बीम आणि मध्यमगती गोलंदाज मेगन शर्ट या तीन ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहेत आणि त्याउलट, भारत मधील एकही गोलंदाज या यादीत नाही .
३. भारताच्या फलंदाजांमध्ये कृष्णमूर्तीचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट ११०. ८६ आहे, मंधाना ९५. ७६ त्यानंतर वर आहे.
४. लेग स्पिनर पूनम यादव हीचा ‘इकॉनॉमी रेट’ ३. ४५ आहे.
५. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४२ सामन्यात भारत फक्त ८ सामने जिंकला आहे.

कर्णधाराचे मत
“सुरुवातीपासूनच भारताने या स्पर्धेत खूप चांगला खेळ केला आहे, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांचा खेळ बघून मी प्रभावित झाले होते . भारत संघ म्हणून अतिशय सक्रिय आहेत आणि मला वाटते की त्यांच्या फलंदाजीकडे अधिक आक्रमक दृष्टिकोण आहे”.
ऑस्ट्रेलियाची उपकर्णधार अॅलेक्स ब्लॅकवेल.

“ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकण्यासाठी आम्हाला जास्त चांगला खेळ करणे गरजेचे आहे”, भारतीय कर्णधार मिताली राज.

मागील सामने
ऑस्ट्रेलिया – विजय, विजय, हार, विजय, विजय.
भारत – विजय, हार, हार, विजय, विजय.

संभाव्य संघ

ऑस्ट्रेलिया
बेथ मनी, निकोल बोल्टोन, मेग लॅनिंग (कर्णधार), एलीसे पेरी, एलीय विलानी, अॅलेक्स ब्लॅकवेल, एलिसा हिली, ऍशली गार्डनर, जेस जोनासन, मेगॉन शट्ट, क्रिस्टन बीम.

भारत
स्मृती मंधाना, पुनम राऊत, मिथाली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, वेद कृष्णमूर्ती, दिप्ती शर्मा, शिखा पांडे, सुषमा वर्मा, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
खेळपट्टीचे अनुमान