IPL2018 : हंगामातील दुसरा सामना जिंकण्यासाठी कोलकाता-दिल्ली करणार जीवाचे रान

कोलकाता | आयपीएलच्या 11व्या हंगामात आजचा सामना दिल्ली डेअरडेविल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या 13 व्या सामन्यात दिल्लीला हरवून कोलकाता विजयाच्या मार्गावर येण्याच्या प्रयत्नात असेल.

कोलकाताने पहिल्या सामन्यात बँगलोरवर 4 विकेट्सने मात करून विजयी सुरूवात केली होती. मात्र नंतरच्या दोन सामन्यात  त्यांना लागोपाठ चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैद्राबादकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

सौजन्य: अल्फा प्रेडीक्शन्स

 

 

 

 

 

 

 

 

 

कोलकाताने चेन्नई विरूध्दच्या सामन्यात 202 धावांचे तर हैद्राबाद विरूध्दच्या सामन्यात फक्त 138  लक्ष्य दिले होते.  पण या दोन्ही सामन्यात चेन्नई  शेवटच्या षटकात तर  हैद्राबाद एक षटक बाकी ठेऊन जिंकले होते. यावेळी  दिनेश कार्तिकच्या कर्णधार पदाची कसोटी होती पण त्यावेळी तो अपयशी ठरला.

दुसरीकडे दिल्लीने आधीच्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे गेल्याने मुंबई विरूध्दच्या सामन्यात उत्कृष्ठ फलंदाजी केली होती. त्यांच्याकडे जेसन रॉय, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल अशी फलंदाजीची भक्कम बाजू  तर गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट, डॅन ख्रिस्टन असे खेळाडू आहेत.

सौजन्य: अल्फा प्रेडीक्शन्स

 

 

 

 

 

 

 

 

 

म्हणुन दिल्ली विजयाची लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल तर कोलकाता पुन्हा विजयाच्या मार्गावर येण्यासाठी  प्रयत्नात असणार आहे.

कधी होईल आयपीएल २०१८ मधील  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा तेरावा सामना आज, 16 एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील सामना?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील आजचा सामना इडन गार्डन स्टेडियम, कोलकाता येथे होईल. तसेच या मैदानावरच कोलकाताचे सर्व घरचे सामने होणार आहेत.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना?
आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

सौजन्य: अल्फा प्रेडीक्शन्स

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार),  रॉबीन उथप्पा, आंद्रे रसेल, ख्रिस लीन, पियुष चावला, कुलदिप यादव, मिशेल जॉन्सन, शुभम गील, इशांक जग्गी, नितीश राणा, विनय कुमार, अपुर्व वानखाडे, रिंकू सिंग, शिवम मवी, जॅवोन सर्लस, कॅमरॉन डेलपोर्ट, प्रसिद क्रृष्णा

दिल्ली डेअरडेविल्स : गौतम गंभीर (कर्णधार), अभिषेक शर्मा, अवेश खान, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, अमित शर्मा, शहाबाज नदीम, विजय शंकर, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, जेसन रॉय, डॅन ख्रिस्टन, कॉलिन मुन्रो, नमन ओझा, ख्रिस मॉरीस, राहूल टेवातिया, हर्षल पटेल, पृथ्वी शॉ, जयंत यादव, संदीप लामिचाने, मन्जोत कालरा