संपुर्ण यादी: आजपर्यंतचे भारतीय चेस ग्रॅंडमास्टर

18 जूलैला भारताला प्रिथु गुप्ताच्या रुपात नवा ग्रँडमास्टर मिळाला आहे. 15 वर्षीय प्रिथू हा भारताचा 64 वा ग्रँडमास्टर ठरला आहे. त्यामुळे 64 घरांच्या या खेळाला 64 वा भारतीय ग्रॅंडमास्टर मिळाला आहे.

1988 मध्ये 5 वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंदच्या रुपाने भारताला पहिला ग्रँडमास्टर मिळाला होता. त्यानंतर भारताला दुसरा ग्रँडमास्टर मिळण्यासाठी तीन वर्षे वाट पहावी लागली होती. दिबियेन्दु बरुआ 1991मध्ये भारताचा दुसरा ग्रँडमास्टर ठरला होता. त्यानंतर 1997 मध्ये प्रविण टिप्से हा भारताचा तिसरा ग्रँडमास्टर ठरला.

पण नंतर भारताने बुद्धीबळात प्रगती करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे मागील 10 वर्षात भारताला तब्बल 44 ग्रँडमास्टर मिळाले आहेत.

तसेच बुद्धिबळमध्ये जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारी भारताच्या पुढे अव्वल क्रमांकावर रशिया असून दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आणि तिसऱ्या स्थानावर चीन आहे.

जगात एकूण 80 लाख बुद्धीबळपटू आहेत. त्यातील केवळ 1,680 एवढेच खेळाडू हे ग्रँडमास्टर आहेत. यामध्ये भारताचे 64 ग्रँडमास्टर्सचा समावेश आहे.

भारतातील तमिळनाडू राज्यातून भारताला सर्वाधिक ग्रँडमास्टर मिळाले आहेत. तमिळनाडूचे तब्बल 23 बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बंगाल आहे. बंगालमधून भारताला 8 ग्रँडमास्टर मिळाले आहेत. तर महाराष्ट्र या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून 7 बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आहेत.

आजपर्यंतचे भारतीय ग्रॅंडमास्टर – 

1988 – विश्वनाथन आनंद
1991 – दिबियेन्दु बरुआ
1997 – प्रविण टिप्से
2000 – अभिजीत कुंटे
2000 – के शशीकरन
2001 – पी हरिकृष्णा
2002 – कोनेरु हम्पी
2003 – सुर्या शेखर गांगुली
2003 – संदीपन चंदा
2004 – आरबी रमेश
2004 – तेजस बकरे
2006 – पी मंगेश चंद्रन
2006 – दिपन चक्रवर्ती
2006 – निलोत्पल दास
2006 – परिमार्जन नेगी
2007 – जीएन गोपाल
2008 – अभिजित गुप्ता
2008 –  एस अरुण प्रसाद
2009 – सुंदर रंजन किदंबी
2009 – आर आर लक्ष्मण
2010 – श्रीराम झा
2010 – दिप सेनगुप्ता
2010 – बी अधिबन
2011 – एपी सेतुरामन
2011 – द्रोणावली हरिका
2012 – एमआर ललीत बाबू
2012 – वैभवी सुरे
2012 – एमआर व्यंकटेश
2012 – सहज ग्रोव्हर
2013 – विधित गुजराती
2013 – एम श्याम सुंदर
2013 – अक्षयराज कोरे
2013 – विष्णू प्रसन्ना
2013 – देबाशिष दास
2013 – सप्तर्षी राय चौधरी
2014 – अंकित राजपरा
2015 – अरविंद चिदंबरम
2015 – कार्तिकेयन मुरली
2015 – अर्जून जयराम
2015 – स्वप्निल धोपाडे
2015 – एसएल नारायण
2016 – शार्दुल घागरे
2016 – दीपतयन घोष
2016 – के प्रियदर्शन
2017 – आर्यन चोप्रा
2017 – श्रीनाथ नारायण
2017 – हिमांशू शर्मा
2017 – अनुराग महामल
2017 – अभिमन्यू पुराणिक
2017 – एमएस तेजकुमार
2018 – सप्तर्षी रॉय
2018 – आर प्रग्नानंधा
2018 – निहाल सरिन
2018 – एरिगैसी अर्जून
2018 – कार्तिक व्यंकटरमण
2018 – हर्षा भारतकोटी
2018 – पी कार्तिकेयन
2018 – जीए स्टॅनी
2019 – एनआर विसाख
2019 – डी गुकेश
2019 – पी ईनियन
2019 – स्वयंम मिश्रा
2019 – गिरिष कौशिक
2019 – प्रिथू गुप्ता

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पोस्टर बॉय राहुल चौधरीने प्रो कबड्डीमध्ये रचला मोठा इतिहास

रोहितबरोबरील वादाबद्दल कर्णधार कोहलीने केले मोठे भाष्य