शानदार अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचे नाव झाले या दिग्गजांच्या यादीत सामील

भारतीय संघात पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शाॅचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. हैद्राबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत पृथ्वीने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 39 चेंडूत अर्धशतक पुर्ण केले.

पदार्पणाच्या सलग दोन कसोटीत भारतासाठी 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादित पृथ्वी शाॅचे नाव दाखल झाले आहे. अशी कामगिरी करणारा तो 8 भारतीय फलंदाज ठरला आहे.

त्याने या सामन्यात 53 चेंडूत 70 धावांची खेळी केली. तो जोमेल वॉरीकन गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल शिमरॉन हेटमेयरने घेतला. त्याने पहिल्या विकेटसाठी केएल राहुलबरोबर 61 धावांची भागीदारी रचली. तर चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली.

कालच्या(12 आॅक्टोबर) 295 या धावसंख्येवरुन पुढे खेळताना विंडिजचा संघ 311 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पहिल्या सत्रात भारताने पृथ्वीच्या अर्धशतकाच्या बळावर 1 बाद 80 धावा केल्या आहेत.

भारतासाठी पहिल्या दोन कसोटीत 50 पेक्षा जास्त धावा करणारे खेळाडू-
-दिलावर हुसेन
-एजी कृपाल सिंह
-सुनिल गावसकर
-सौरव गांगुली
-राहुल द्रविड
-सुरेश रैना
-रोहित शर्मा
-पृथ्वी शाॅ

महत्वाच्या बातम्या-