तूम्ही जर अजिंक्य रहाणे- पृथ्वी शाॅचे फॅन असाल तर ही आहे तूमच्यासाठी सर्वात मोठी बातमी

मुंबई। विंडिज विरुद्ध दमदार आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईकडून खेळणार आहेत.

या दोघांनीही नुकत्याच पार पडलेल्या विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. पण 21 आॅक्टोबरपासून विंडिजविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात या दोघांचाही समावेश करण्यात आलेला नाही.

त्यामुळे हे दोन्ही खेळाडू मुंबई संघाकडून खेळण्यासाठी परतले आहेत. या दोघांव्यतिरिक्त भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माही मुंबईकडून उपांत्य फेरीत खेळेल. तो बिहारविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत मुंबई संघाकडून खेळला आहे.

या तिघांच्या उपांत्य फेरीतील समावेशाबद्दल मुंबईचे प्रशिक्षक आणि भारताचे माजी गोलंदाज अजित अगरकरने माहिती दिली आहे.

शॉ हा विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने दोन सामन्यात मिळून 118.50 च्या सरासरीने 237 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.

पण मुंबई संघात शॉच्या परतण्याने सलामीला कोणाला संधी मिळणार हा प्रश्न मुंबईसाठी उपस्थित झाला आहे. कारण उपांत्यपूर्व सामन्यात रोहित शर्मा आणि अखिल हेरवाडकर यांनी सलामीला फलंदाजी केली होती.

मुंबईने या विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी या स्पर्धेत अजून एकही पराभव स्विकारलेला नाही. तसेच मुंबईने रविवारी (14 आॅक्टोबर) बिहारला उपांत्यपूर्व सामन्यात 9 विकेट्सने पराभूत करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

आता मुंबईचा उपांत्य फेरीचा सामना झारखंड विरुद्ध 18 आॅक्टोबरला होणार आहे. त्याआधी 17 आॅक्टोबरला दिल्ली विरुद्ध हैद्राबाद यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना होईल. त्यानंतर 20 आॅक्टोबरला अंतिम सामना होणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

त्यावेळी आम्ही पृथ्वी शॉच्या १० टक्केही आसपास नव्हतो – विराट कोहली

टीम इंडियात संधी तर मिळाली, त्याच दिवशी सामना जिंकल्यामुळे त्या दोन खेळाडूंना परतावे लागले पुन्हा घरी

ISL 2018: दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघांचा सुरू आहे संघर्ष