समालोचकांच्या प्रश्नाने पृथ्वी शॉ पडला गोंधळात, सांगितले गांगुली, पाँटिंगमधील एकाला निवडण्यास, पहा व्हिडिओ

जयपूर। सोमवारी(22 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2019 चा 40 वा सामना पार पडला. सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यादरम्यान समालोचकांनी दिल्लीचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला एक गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजी करत असताना शॉ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी सिमन डौल आणि मुरली कार्तिक समालोचन करत होते.

यावेळी या समालोचकांनी शॉला प्रश्न विचारला की दिल्लीच्या सराव सत्रादरम्यान तो दिल्लीचा सल्लागार सौरव गांगुली की दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगकडून सर्वात जास्त शिकतो.

या गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नावर शॉनेही हसून हुशारीने उत्तर देणे टाळले. शॉने सांगितले की ‘मला ऐकू येत नाही. कदाचीत संपर्क साधण्यात काहीतरी समस्या येत असावी.’ पण नंतर हसत शॉ म्हणाला ‘दोघांकडूनही शिकायला मिळते.’

शॉचे हे उत्तर ऐकूण सिमन आणि कार्तिकलाही हसू आले. शॉच्या उत्तरानंतर ते म्हणाले ‘शॉने असे उत्तर दिले, जसे एखाद्या मुलाला आई की वडील आवडतात असे विचारल्यार तो दोघेही असे उत्तर देतो.’

या सामन्यात राजस्थानकडून अजिंक्य रहाणेने नाबाद 105 धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे या दोघांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 6 बाद 191 धावा करत दिल्ली समोर 192 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून रिषभ पंत(78*) आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवनने(54) अर्धशतकी खेळी केली. तसेच शॉने 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना पंतबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारीही रचली. त्यामुळे दिल्लीने 19.2 षटकात 192 धावांचे आव्हान 6 विकेट्स बाकी ठेवत सहज पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

रिषभ पंतसाठी आयपीएलमधील हा आहे सर्वात खास क्षण, पहा व्हिडिओ

– सचिन आणि शारजामधील ती वादळी खेळी

पाकिस्तनचा नवा फंडा, विश्वचषकात पाकिस्तानसाठी नऊही सामने भारतासारखेच