असा बायोडाटा आपण पाहिलाय का ?

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दल एक विक्रम कायम सांगितला जातो तो अर्थात सचिनने रणजी, दुलीप, देवधर आणि इराणी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले होते. अशीच काहीशी कामगिरी केली आहे त्याच मुंबईच्या मातीतील एका खास खेळाडूने. त्या खेळाडूच नाव आहे पृथ्वी शॉ आणि वय आहे केवळ १७ वर्ष आणि ३२० दिवस.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वयाच्या १५ वर्ष आणि २३०व्या दिवशी रणजी ट्रॉफी पदार्पणात शतक झळकावले होते. त्यांनतर पुढे सचिनने भारतातील प्रतिष्ठेच्या दुलीप, देवधर आणि इराणी ट्रॉफीच्या पदार्पणातही शतक केले. विशेष म्हणजे सचिनने इराणी ट्रॉफीमध्ये नाबाद शतकी खेळी केली होती.

पृथ्वी शॉनेही अशीच कामगिरी केली आहे. ५ जानेवारी २०१७ रोजी सेमीफायनलमध्ये तामिळनाडूविरुद्ध खेळताना त्याने १२० धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याचे वय होते १७ वर्ष, १ महिना आणि २७ दिवस. तर ५ दिवसांनी सुरु झालेल्या रणजी ट्रॉफी अंतिम फेरीत त्याने पहिल्या डावात ७१ आणि दुसऱ्या डावात ४४ धावांची खेळी केली.

भारतीय संघाची दार वयाच्या १७व्या वर्षीच ठोठावणाऱ्या या खेळाडूचा बायोडाटा…

#नाव: पृथ्वी शॉ

#वय: १७ वर्ष आणि ३२०

#बालपण- मुंबईपासून ७०-८० किलोमीटर असणाऱ्या विरार येथे

#वयाच्या ४थ्या वर्षी आईचे छत्र हरपले

#क्रिकेटसाठी वयाच्या ८व्या वर्षी बांद्र्यातील रिझवी स्कूलमध्ये दाखल

#वडील पंकज शॉ यांनी आपला व्यवसाय बंद करून पृथ्वीच्या ९० मिनिटे रोज होणाऱ्या प्रवासासाठी पूर्णवेळ देणे ठरवले .

#वयाच्या १४व्या वर्षी कांगा लीगच्या डिव्हिजन सामन्यात शतक झळकावले. अशी कामगिरी करणारा सर्वात तरुण खेळाडू

#डिसेंबर २०१४मध्ये स्कूल क्रिकेटमध्ये ५४६ धावा तडकावल्या. अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

#मुंबई अंडर १६ संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

#दोन दशकातील पहिला मुंबईकर खेळाडू बनला ज्याने रणजी पदार्पणात शतक केले.

#जुलै २०१७ मध्ये युथ टेस्टमध्ये दोनही डावात अर्धशतकी खेळी.

#१८ वर्ष वय पूर्ण करण्यापूर्वी दोन देशांतर्गत स्पर्धेत पदार्पणात शतक करणारा सचिन नंतर दुसरा खेळाडू