तो तेंडुलकर आहे; या दिग्गजाने केली शॉची तुलना सचिनशी!

0 243

१९ वर्षांखालील विश्वचषकात काल पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताचा कर्णधार पृथ्वी शॉने चमकदार कामगिरी केली . या सामन्या दरम्यान विंडीजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी पृथ्वी शॉची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली आहे.

काल पृथ्वीने फलंदाजी करताना पुढे येऊन काही फटके मारले. हे फटके बघून बिशप यांना समालोचन करताना सचिनची आठवण झाली आणि ते म्हणाले “तो तेंडुलकर आहे.”

काल भारताने ऑस्ट्रेलियावर १०० धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात १८ वर्षीय पृथ्वीने ९४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तसेच त्याने कालच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही पटकावला होता.

त्याच्या या खेळीचे सर्वांनी कौतुक केले होते. कर्णधार म्हणून त्याचा कालचा पहिला विजय होता.

पृथ्वी मागील काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळताना चांगल्या धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आजपर्यंत ९ सामन्यात ५ शतके आणि ३ अर्धशतकांसह ९६१ धावा केल्या आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: