अॅडलेड कसोटी दरम्यान पृथ्वी शॉने दिली फिटनेस टेस्ट

अॅडलेड। भारताची आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 235 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताने 15 धावांची आघाडी घेतली आहे.

त्याचबरोबर भारतासाठी आज आणखी एक चांगली गोष्ट पहायला मिळली आहे. ती म्हणजे भारताचा दुसरा डाव सुरु होण्याआधी सराव सामन्यात दुखापत ग्रस्त झालेला पृथ्वी शॉने फिटनेस टेस्ट दिली आहे.

पण अजून बीसीसीआयकडून त्याच्या दुखापतीच्या प्रगतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.  मात्र काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माहिती दिली होती की त्याच्या प्रकृतीत जलद प्रगती होत असून तो मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन करु शकतो.

तसेच तो कालही (7 डिसेंबर) बाउंड्री लाइनच्या जवळ कोणत्याही आधाराशिवाय उभा राहुन सामना पाहत होता. त्यामुळे तो लवकरच बरा होईल अशी चाहत्यांना आपेक्षा आहे.

शॉ आॅस्ट्रेलिया एकादश विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या सराव सामन्यात शुक्रवारी(30 नोव्हेंबर) दुखापतग्रस्त झाला होता.

या सामन्यात त्याला क्षेत्ररक्षण करताना बाउंड्री लाइनच्या जवळ मिड-विकेटला असताना झेल घेण्याच्या प्रयत्नात डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला लगेचच दवाखान्यात नेण्यात आले होते. त्याला मैदानातूनही भारतीय संघाच्या मेडिकल टीमने अक्षरश: उचलुन ड्रेसिंगरुममध्ये नेले होते.

यामुळे त्याला अॅडलेड कसोटीला मुकावे लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

यष्टीरक्षक रिषभ पंतने केली एमएस धोनीच्या या खास विक्रमाची बरोबरी

Video: जेव्हा कर्णधार कोहली मैदानातच दाखवतो नृत्यकला…

Video: मैदानावर सोडा विलियमसनने पाकिस्तानला मैदानाबाहेरही धूतले