पृथ्वी शाॅचा खेळ पाहून या दिग्गज खेळाडूला आली सेहवागची आठवण

विडिंजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूमध्ये खेळण्याची संधी पृथ्वी शाॅला मिळाली. पृथ्वीने या संधीचे सोने केले. त्याने पदार्पणात  99 चेंडूत शतक ठोकले. त्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारताचा अनुभवी फलंदाज सुरेश रैना देखील यात मागे राहिला नाही. तो पृथ्वी शाॅच्या फलंदाजीने प्रभावित झाला असून पृथ्वी शाॅला फलंदाजी करताना पाहून त्याला भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची आठवण झाली आहे.

पृथ्वीची स्तुती करताना रैना म्हणाला “त्याने खुप चांगला खेळ केला. त्याचा खेळ पाहून मला वीरूची अाठवण झाली. त्याचा खेळण्याचा उत्साह आणि मैदानावर असलेला निर्भिड वावर   आपल्याला आवडला आहे”.

रैनाने देखील कसोटीमध्ये पदार्पणातच शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. त्याने 2010 मध्ये श्रीलंकेविरूद्ध पदार्पणातच 120 धावांची खेळी केली होती. रैना सध्या भारतीय संघात मर्यादित षटकांचेच सामने खेळत आहे.

पृथ्वी शाॅने 154 चेंडूत 134 धावांची खेळी केली आहे. त्याने रणजी ट्राॅफी, दुलीप करंडक आणि कसोटीत पदार्पणातच शतक ठोकण्याची किमया केली आहे.

महत्वाच्या बातम्या-