रोहित शर्मा, मुरली विजयचे कसोटी संघात पुनरागमन; आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

बीसीसीआय निवड समितीने शुक्रवारी(26 आॅक्टोबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 18 जणांच्या भारतीय संघाची निवड केली आहे.

या संघात रोहित शर्मा, पार्थिव पटेल आणि मुरली विजय यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. रोहित या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत शेवटचे खेळला होता. तसेच मुरली विजयलाही इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर भारतीय संघातून वगळण्यात आले होते.

पार्थिव पटेलच्या भारतीय संघातील समावेशाने रिषभ पंत आणि पार्थिव असे दोन यष्टीरक्षकांचे पर्याय भारतासमोर असतील.

रोहितला सलामीवीर फलंदाज शिखर धवन ऐवजी संधी देण्यात आली आहे. शिखरला विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेप्रमाणेच आॅस्ट्रिलया विरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आले आहे.

याबरोबरच हनुमा विहारी आणि पृथ्वी शॉ या दोन्ही युवा क्रिकेटपटूंना त्यांनी पदार्पणात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात कायम ठेवण्यात आले आहे.

त्याचबरोबर कुलदीप यादव, रविंद्र जडेजा आणि आर अश्विन या फिरकी गोलंदाजांना आणि मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांना  संधी देण्यात आली आहे.

भारत आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ-

विराट कोहली, मुरली विजय, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार.

महत्त्वाच्या बातम्या:

निवड समितीने दाखवला धोनीला घरचा रस्ता, टीम इंडियातून पहिल्यांदाच वगळले

Video: एकच ग्लोव्हज घालून फलंदाजीला आला हा फलंदाज; पुढे काय झाले ते पहाच

या कारणामुळे केदार जाधवला विंडीज विरुद्ध टीम इंडीयात मिळाले नाही स्थान