टीम इंडियाला मोठा झटका, पृथ्वी शाॅ पहिल्या कसोटीतून बाहेर

डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा सलामीवीर पृथ्वी शाॅ पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला आहे.

भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया ११ संघात सुरु असलेल्या सराव सामन्यात शाॅला दुखापत झाली होती.

भारतीय संघाने शाॅच्या जागी पहिल्या कसोटीसाठी बदली खेळाडूची घोषणा मात्र केली नाही.

त्याच्या डाव्या पायाला झेल घेतना आज तिसऱ्या दिवशी दुखापत झाली. त्याला तात्काळ दवाखाण्यात नेण्यात आले आहे. तेथे त्याच्या पायाचे स्कॅन केले जाणार आहे. याची माहिती बीसीसीआयने ट्वीटद्वारे दिली आहे. 

जेव्हा ही दुखापत झाली तेव्हा शाॅला मैदानावरुन टीम इंडियाच्या मेडिकल टीमने अक्षरश: उचलुन ड्रेसिंगरुममध्ये नेले.

पहिला कसोटी सामना अॅडलेडला ६ डिसेंबर रोजी होणार आहे.