एका मुंबईकराच्या दुसऱ्याकडून मोठ्या अपेक्षा, शाॅकडून रहाणेला आहे ही गोष्ट अपेक्षित

मुंबई | भारतीय संघात पृथ्वी शाॅ पदार्पण होणार राजकोट येथे विंडीजविरूद्ध  होणाऱ्या सामन्याद्वारे होणार आहे. त्यावर भारतीय संघाचा उपकर्णधार आणि मुंबईचा कर्णधार अंजिक्य रहाणेने आनंद व्यक्त केला आहे.

त्याने त्याची खेळण्याची शैली बदलू नये असा सल्लाही रहाणेने पृथ्वीला दिला आहे.

”त्याला मी मुंबई संघात खूप दिवसापासून खेळताना पाहत आहे. त्याने आक्रमक सलामीवीर म्हणून भारत अ संघाकडून देखील चांगली कामगिरी केली आहे.” असे अजिंक्य रहाणे म्हणाला.

”त्याला ही संधी त्याचा खेळ दाखवण्यासाठी मिळाली आहे. तो नक्कीच संधीचा फायदा घेईल आणि चांगली कामगिरी करेल. त्याने जे काम मुंबई आणि भारत अ संघासाठी केले तेच काम त्याने भारतीय संघासाठी करावे,” असेही रहाणे पुढे म्हणाला.

इंग्लंडमधील अपयशानंतर रहाणेने विजय हजारे ट्राॅफीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला विंडीजविरुद्ध होणाऱ्या मालिकेपुर्वी चांगला सराव मिळाला आहे.

”इंग्लडवरून परतल्यानंतर मी मुंबईसाठी चांगली कामगिरी करण्याचा विचार करत होतो. त्यामधील खेळीचा मला अागामी मालिकेसाठी फायदा होणार आहे,” असा विश्वास रहाणेने व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-