पृथ्वी शॉचा पुन्हा धमाका, संघाच्या ६७ धावांपैकी एकट्याने केल्या ५७ धावा

१९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकात आज भारतीय संघाने पापुआ न्यू गिनी संघावर १० विकेट्सने मात केली. यात एकट्या पूर्णत्वही शॉने ५७ धावांची तुफानी खेळी केली.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजांची निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या पापुआ न्यू गिनी संघाने २१.५ षटकांत सर्वबाद ६४ धावा केल्या. यात अनुकूल रॉय या गोलंदाजाने भारताकडून ५ विकेट्स घेतल्या. रॉयची आजची गोलंदाजी ही भारताकडून विश्वचषकातील दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी होती.

६८ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने ८ षटकातच विजय मिळवताना एकही विकेट गमावली नाही. ८ षटकांत ६७ धावा करताना सलामीवीर मनजोत कार्लाने ९ चेंडूत नाबाद ९ तर कर्णधार पृथ्वी शॉने ३९ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या.

या ५७ धावांत पृथ्वीने तब्बल १२ चौकार खेचले.

हा सामना भारतीय संघाने २५२ चेंडू राखून जिंकला. अंडर १९ विश्वचषकातील चेंडू राखून मिळवलेल्या विजयातील हा दुसरा मोठा विजय आहे. तर १० विकेट्स राखून भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेत विजेता ठरला आहे.