आयपीएल लिलाव: पृथ्वी शॉ खेळणार या संघाकडून

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव आज बंगलोरमध्ये सुरु आहे. या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंची चांगली बोली लागली आहे. परंतु अनुभवी खेळाडूंबरोबरच तरुण खेळाडूंसाठी फ्रॅन्चायझींमध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळाली आहे.

सध्या चांगलाच चर्चेत असणारा पृथ्वी शॉला आज आयपीएल लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने १.२० कोटीला खरेदी केले आहे. या वर्षभरात देशांतर्गत स्पर्धेत पृथ्वी शॉने चमकदार कामगिरी केली आहे. तसेच न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात तो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेशही केला आहे.

पृथ्वीप्रमाणेच त्याचा १९ वर्षांखालील भारतीय संघातील संघसहकारी शुभम गिलला कोलकाता नाईट रायडर्सने १.८० कोटी देऊन संघात घेतले आहे. याबरोबरच मनन वोहरा, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी या तरुण खेळाडूंनाही चांगली बोली लागली आहे.