दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू झालायं प्रिया प्रकाशचा फॅन

अभिनेत्री प्रिया प्रकाशचा फॅन क्लब दिवसेंदिवस वाढत असुन त्यात अाता एका दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची भर पडली आहे. 

हा खेळाडूही प्रिया प्रकाशसारखाच अचानक प्रकाशझोतात आला असुन त्याचे नाव आहे लुंगी न्गीडी. त्याच झालं असं, lucifer नावाच्या एका चाहत्याने प्रिया प्रकाश आणि लुंगी न्गीडीचा एक खास विडीओ तयार करुन त्याला ‘वॅलेंटाईन डे’चे खास गिफ्ट दिले आहे. 

त्यावर लुंगी न्गीडीनेही खास उत्तर दिले आहे. “वॅलेंटाईन डे डन” असा हटके रिप्लाय या खेळाडूने दिला आहे. 

लुंगी न्गीडी हा दक्षिण अाफ्रिकेचा प्रतिभावान वेगवान गोलंदाज असुन त्याने २ कसोटी सामने, ३ टी२० सामने आणि ४ वनडे सामने खेळले आहेत.