प्रो कबड्डी: असा असेल जयपूर पिंक पँथरचा मुख्य संघ

प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमाचा अंतिम सामना जिंकून प्रो कबड्डीच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरणारा संघ म्हणजे जयपूर पिंक पँथर. त्यानंतर या संघाच्या कामगिरीला ग्रहण लागले आणि पुढील दोन मोसम  म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या मोसमात जयपूरचा संघ सेमी फायनल पर्यंतही मजल मारू शकला नाही. पण चौथ्या मोसमात संघाने लौकिकाला साजेशी कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आणि ते या मोसमाच्या उपविजेते ठरले.

जयपूर असा एकमेव संघ होता की ज्याने नवीन मोसमासाठी संघात एकही खेळाडूला कायम ठेवले नव्हते. पण आपल्या आवडत्या महत्वपूर्ण खेळाडू जसवीर सिंगला ५१ लाख आणि नवनीत गौतम यांला २४ संघाने बोली लावून विकत घेतले.

या वर्षी जयपूर संघात मंजित चिल्लर या महत्वपूर्ण ऑल राउंडर खेळाडूचा सहभाग आहे. त्यामुळे संघाला कमालीची ताकद मिळाली असून मंजित रिडींग आणि डिफेंडिंग या दोन्ही कामगिरीत संघाला विजय मिळवून देऊ शकतो. जयपूरने मंजितसाठी तब्बल ७५.५ लाखांची रक्कम मोजून संघात घेतले आहे. जयपूरने के. सीलवामानी या तरुण उदयोन्मुख रेडरला ७३ लाख किंमत देऊन संघात सामील करून घेतले आहे आणि तो संघात डू ऑर डाय रेड स्पेशालिस्ट म्हणून कामगिरी बजावू शकतो.

अनुप कुमारच्या घराण्यातील असणारा पवन कुमार याला जयपूरने दुसरा मुख्य सहायक रेडर म्हणून संघात घेतले आहे. तर तो स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कामगिरी सुधारण्याचा प्रयन्त करेन.

असा असेन  जयपूर पिंक पँथरचा मुख्य संघ
१ मंजित चिल्लर -कर्णधार
२ जसवीर सिंग-रेडर
३ के. सिलवामनी -रेडर
४ पवन कुमार -रेडर
५ नवनीत गौतम -लेफ्ट कॉर्नर
६ मनोज धुल-राइट कॉर्नर
७ सोमवीर शेखर -राइट कव्हर