संघ बदलुनही अनुप कुमारच्या नावावर होणार असा विक्रम जो कुणालाही मोडणं केवळ अशक्य!

मुंबई | भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल अनुप कुमार प्रो-कबड्डी २०१८मध्ये एक खास विक्रम करणार आहे. तसा तो विक्रम त्याच्या नावावर आधीपासून आहे. परंतु आता संघ बदलल्यामुळे तो कायम राहिल की नाही अशी शंका होती.

अनुप कुमार हा प्रो- कबड्डी इतिहासातील असा एकमेव खेळाडू आहे जो सर्व हंगाम एकाच संघाकडून आणि सर्व सामने कर्णधार म्हणुन खेळला आहे. तो तब्बल ५ हंगाम यु मुंबा संघाचा कर्णधार होता. त्यात यु मुंबाला एकदा विजेतेपद मिळाले.

तो या हंगामात जयपुर संघाचा कर्णधार राहणार हे जवळपास निश्चित आहे. याबद्दल जयपुरचा संघमालक अभिषेक बच्चनने लिलावावेळी याचे स्पष्ट संकेत दिले होते.

त्यामुळे प्रो कबड्डीमध्ये जरी सर्व हंगामात एकाच संघाकडून खेळायची संधी हुकली असली तरी सर्व हंगामात कर्णधार म्हणुन भुमिका बजावणारा तो एकमेव खेळाडू ठरणार आहे.

अनुपने यु मुंबाकडून ७८ सामन्यात एकुण ५४६ गुणांची कमाई केली आहे. तो प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ५वा आहे.